सत्ता येताच धानाला २५०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव-खा. प्रफुल पटेल

0
20

साकोली,दि.03:- सतेत आल्यावर शेत- यांच्या धानाला प्रति क्विंटल २५०० रुपये हमी भाव आणि बोनस देणार अशी घोषणा खासदार प्रफुल पटेल यांनी केली. ते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ साकोली येथील आर्शिवाद लॉन येथे आयोजित प्रचार सभे दरम्यान बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे, माजी आमदार सेवक वाघाये आदी उपस्थित होते. पुढे पटेल म्हणाले की गेल्या निवडणुकीत भाजपने शेतक- यांच्या उद्धाराकरिता स्वामीनाथन आयोग लागू करून शेतक-यांच्या खर्चा येतो त्यांवर ५० टक्के नफा देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ती घोषणा हवेतच विरली ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही. वरून आता २०१९ च्या निवडणुकीत २०२२ पर्यंत शेतक-यांना आम्ही दुप्पट दाम देण्याचे आश्वासन दिले आहे.

यावर जनेला शंका आहेच, दरम्यान प्रफुल पटेल म्हणाले की आज नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचाराचे रणशिंग फुकले असून वर्धा येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. नेहमी विकासाच्या मुद्यावर भाषण देत असलेले नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुखांवर टीका करीत पवारांचा हातातून पक्ष निसटत असून, पक्ष नेतृत्वावर कुटुंबात कलह सुरु असल्याचे जाहीर सभेत संबोधित केले.एवड्यावरच न थांबता देशात कुणाचे वारे वाहत आहे हे त्यांना माहित असल्यामुळे त्यांनी निवडणुकी पूर्वी माघार घेतल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तर यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी उत्तर देत एका मोठ्या नेत्यांनी दुस- या मोठ्या नेत्या बद्दल असे हलके विधान करू नये अशी भूमिका आपल्या भाषणातून मांडली. मोठ्या नेत्यांनी त्यातही पंतप्रधान सारख्या व्यक्तीमत्वाने टीकेचा स्तर काय असावा याबद्यल एक मर्यादा पाळावी असे ही पटेल म्हणाले.