प्रचार सोडून बसप उमेदवारांने अपघातग्रस्ताला दिला मानवतेचा परिचय

0
28

लाखादूंर,दि.03ः- सध्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा संपुर्ण जिल्ह्यात सुरु आहे.त्यातच आज लाखादूंर तालुक्यात सुध्दा सर्वच पक्षाच्या उमेदवाराचे प्रतिनिधीही प्रचार करीत आहेत.याच तालुक्याच्या प्रचारदौर्यावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार व व्यवसायांने डाॅक्टर असलेल्या विजया नंदुरकर(ठाकरे)या प्रचारानिमित्त सोनी-चप्राड रस्त्याने सभेला संबोधित करण्याकरीता जात असतांना राज्यमार्गाच्या कडेला लोकांची गर्दी दिसून आली.त्याठिकाणी अपघात होऊन एक इसम जखमी झाल्याचे त्यांना कळताच त्या आपल्या प्रचार वाहनातून उतरल्या आणि जखमी व्यक्तीकडे गेल्या.त्या जखमीव्यक्तिची विचारपूर करीत आपल्या प्रचाराच्या गाडीतच त्यांनी आधी जखमीला गाडीत घेतले आणि लाखादूंरच्या रुग्णालयाकडे धाव घेतली.रुग्णालयात जाऊन त्या जखमीवर उपचार होईपर्यंत त्या तिथेच थांबल्या.विशेष म्हणजे डाॅ.विजया नंदुरकर यांच्या आधी इतर उमेदवारांच्या प्रचाराच्या गाड्याही गेल्या परंतु त्या गाड्याना हात दाखविल्यानंतरही त्या थांबल्या नसल्याचे त्याठिकाणी उपस्थितांचे म्हणने होते. प्रचाराला जेवढे महत्व तेवढेच कुणाला मदत करणेही महत्वाचे हे जाणून घेत बसप उमेदवारांने आधी जखमीला उपचार नंतरच प्रचार हा निश्चिय केल्याने आज एका अपघातातील जखमीला वेळेवर उपचार मिळू शकल्याचे बोलले जात आहे.