विजय हिप्परकर मुख्याध्यापक मंडळाच्या जिल्हा कार्यकारणीत

0
33

संख,दि.03ः- जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील श्री संत सद्गुरू भिमदास महाराज करांडे विद्यामंदीराचे मुख्याध्यापक विजयकुमार यशवंत हिप्परकर यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली आहे. जिल्हा मुख्याध्यापक कार्यकारिणींची बैठक शिक्षण सेवक सहकारी सोसायटीत पार पडली.या बैठकीत त्यांची निवड बिनविरोध झाल्याने हिप्परकर यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

बैठकिला राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष  विजयसिंह गायकवाड जिल्हा मुख्याध्यापक महामंडळाचे पांढरे,अरविंद कदम, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष  खंडेराव जगदाळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रवीण पारसे , प्रमोद पाटील, शिक्षण परिषदेचे नागरगोजे सर ,सांगली जिल्हा कायम विना अनुदानित कृती समितीचे अध्यक्ष संतोष जत्ते स,  निगडी बु. हायस्कूलचे मुख्याध्यपक मनोहर चव्हाण  , सनमडी मुख्याध्यापक,एस.के. माळी गिरगांवच हायस्कूलचे जाधव ,जालिहाळ बु. मुख्याध्यापक जाधव डी. डी , रामपूर हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत सावंत , बिळूर हायस्कूल मुख्याध्यापिका सुजाता माळी ,  जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. या प्रसंगी नूतन कार्यकारणी सदस्य विजयकुमार हिप्परकर म्हणाले,   शैक्षिणक अडचणी सोडवण्यासाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या माध्यमातून सर्वोत्तपरी प्रयत्न करून मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व शैक्षणिक समस्या सोडविण्यात येतील,असे  मत मांडले.                                                       .