मतदार जागृतीवर भर दया – डॉ. पार्थ सारथी मिश्रा

0
29

भंडारादि : निवडणूक म्हणजे राष्ट्रीय उत्सव असून निवडणूकीच्या कामासाठी सर्वांनी  सज्ज रहावे. निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणूकांची दिव्यांग सुलभ व मतदानापासूनकोणीही वंचित राहू नये या उद्देश्याने  तयारी केली असून  आपल्या भागात जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी मतदार जागृतीवर भर देण्याचे आवाहन मुख्य निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थसारथी मिश्रा यांनी केले.तुमसर विधानसभा मतदार संघाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्याचेआवाहन केले. उपविभागीय अधिकारी मुकूंद टोणगावकर, तहसिलदार  गजेंद्र बालपांडे,  मोहाडी तहसिलदार धनंजय देशमुख, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यावेळी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी तुमसर यांच्या कार्यालयात डॉ. मिश्रा यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तुमसर विधानसभा मतदार संघात १ लाख ५७ हजार ७०९ पुरुष, १ लाख ४७ हजार६३६ स्त्री मतदार असे एकूण २ लाख ९९ हजार ३३९ मतदार आहेत. यावर्षी आयोगाने दिव्यांग सुलभ निवडणूका घोषित केल्या आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रात १ हजार २५६ दिव्यांग मतदारआहेत. या मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश डॉ. मिश्रा यांनी दिले. दिव्यांग मतदार असलेल्या मतदान केंद्रावर व्हिलचेअर व रॅम्प अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसा प्रकाश, शोच्छालय व मतदारांना बसण्याची व्यवस्था असावी, असे त्यांनी सांगितलेृ २०१४ च्या निवडणूकीच्या तुलनेत या निवडणूकीतअधिक टक्के मतदान आयोगाला अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. समाधान, सुविधा, ई-व्हिजील, ऑनलाईन परवानगी आदिंचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आयटीआय तुमसर येथेईव्हिएम-व्हीव्हीपॅट प्रशिक्षण केंद्राला डॉ. मिश्रा यांनी भेट दिली.  या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मॉडेल सखी केंद्राला भेट देवून डॉ. मिश्रा यांनी व्यवस्थेचे कौतुक केले. मतदान केंद्रावरमतदारांना सौजन्याची वागणूक दयावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

आयटीआय तुमसर येथे आयोजित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थिती दर्शविली. यावेळी बोलतांना मिश्रा म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत   कायम अपडेट  रहावेलागते. याबाबतचे प्रशिक्षण आपणास देण्यात येत आहे. निवडणूक ही राष्ट्रीय सेवा असून निवडणूक कार्यासोबतच आदर्श आचारसंहितेचे पालन होणे गरजेचे आहे. कर्तव्यावर असतांना आपल्याहातून पारदर्शक सेवा होणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी व कर्तव्य समजावून घ्यावे. काही अडचण असल्यास तेव्हाच शंकेचे निरसन करावे व बिनचूक काम करावे,असा सल्ला त्यांनी दिला.

या नंतर ईव्हीएम-व्हीव्हीपॅट ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुमला भेट देवून पाहणी केली. स्ट्राँगरुमची सुरक्षा व  सिसिटिव्ही याबाबत त्यांनी आढावा घेतला. तुमसर जवळ असलेल्या हसारा मतदान केंद्राला  भेट देवून मतदान केंद्रावरील सुविधांची पाहणी केली. त्यानंतर भंडारा येथील पटेलपुरा वार्डातील बुथ क्रमांक ९०, ९१,९३ व ९४ केंद्रांना भेटी देवून सोयीसुविधांची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ होते.