धोटे सुतिका गृह येथे आरोग्य तपासणी शिबिर

0
19

गोंदिया,दि.04:- नगर परिषद गोंदिया च्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व दिनदयाळ अंत्योदय योजना (DAY NULM) अंतर्गत स्थानिक रेलटोली स्थित धोटे सुतिका गृह येथे नागरी बेघरांसाठी निवारा (आश्रय स्थळ) सुरु करुन बेघर नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात केटीएस शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय चिकित्सक डॉ.राजेंद्र वैद्य, शासकीय रक्तपेढ़ीचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाने, सामाजिक कार्यकर्ते अतुल सतदेवे, कौशल उद्योजकता व्यवस्थापक सुनंदा बिसेन, DAY NULM चे व्यवस्थापक धनराज बनकर, समुदाय संघटक रमा मिश्रा व ज्योत्सना बोम्बर्डे प्रामुख्याने उपस्थीत होते. या प्रसंगी बेघर झालेले लाभार्थी नागरिकांची निशुल्क आरोग्य तपासणी केटीएस रुग्णालयातील वैद्यकीय चिकित्सक डॉ.राजेंद्र वैद्य यानी करुन मधुमेह, रक्तदाब हृदयरोग विविध रोगांबद्द्ल मार्गदर्शन केले आणि उन्हाळ्यात आरोग्य विषयक घेणारी काळजी याबद्द्ल माहिती दिली. शासकीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाने यानी रक्तगट तपासणी सोबत शरिरात रक्त कमतरता संबंधीत रोगनिवारण माहिती दिली, सामाजिक कार्यकर्ते अतुल सतदेवे यानी नगर परिषदेचे आभार व्यक्त करित धोटे सुतिका गृह या जुन्या इमारतीची मरम्मत करुन राहण्यायोग्य बनवीले व शहरातील रेलवे स्टेशन, बस स्टैंड अशा विविध ठिकाणी उपाशी तापाशी फिरणा-या लावारिस नागरिकांकरिता भोजन, वस्त्र, निवारा व आरोग्य तपासणी याची सोय करणा-या या मानवीय उपक्रमाचे आपल्या शब्दातून कौतुक केले आणि या उपक्रमाला त्यांच्या संविधान बचाव कृती संघ या सामाजिक संघटनेतर्फे निशुल्क सेवा प्रदान करण्याचे आश्वासन दिले. कौशल उद्योजकता व्यवस्थापक सुनंदा बिसेन यानी आपल्या जीवनातील निजी कार्यक्रमांचे खर्च कमी करुन या स्थळाला आर्थिकरित्या किंवा येथील बेघर नागरिकाना वस्तूरुपाने भेट द्यावी असे आवाहन केले. या उपक्रमाचे व्यवस्थापक धनराज बनकर यानी कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती देताना सांगितले की सध्या लाभार्थी संख्या 20 अशी मर्यादीत असुन या बेघर नागरिकांच्या ब-यापैकी देखरेख सोयी सुविधेकरिता एनजीओ तथागत क्रिडा मंडळ सोबत करार करण्यात आले आहे आणि भावी काळात 100 बेघर लाभार्थी राहू शकतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पडावे म्हणून निवारा व्यवस्थापकीय मंडळचे व्यवस्थापक एच.आर. मेश्राम, केयर टेकर पी.ए. कुथेकर, केयर टेकर राजेंद्र लिल्हारे , केयर टेकर रविंद्र बोरकर यानी सहकार्य केले. अतिथी मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करुन सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आले.