भंडारा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रातील स्थानात बदल

0
21

 भंडारादि. 4 :-  11- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 संबंधाने भंडारा(अ.जा.) विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रंमाक 50-शहापूर, 116,117-भंडारा इत्यादी मतदान केंद्राचे स्थानात बदल करण्याचे प्रस्ताव तसेच शहरी भागातील 1400 पेक्षा जास्त मतदार असलेले मतदान केंद्र क्रमांक 66,71-भंडारा या मतदान केंद्राकरीता सहाय्यकारी मतदान केंद्राचे प्रस्ताव व 53-शहापूर, 58-भोजापूर, 165-बेरोडी, 176-गणेशपूर, 256-वाघबोडी या मतदान केंद्राचे इमारतीचे नावात बदलबाबतचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आले होते. त्यानुसार सदर प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केलेली आहे.

 त्याबाबतचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता भंडारा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राचे स्थानात बदल करण्यात आलेल्या, सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून प्रस्तावित केलेल्या व मतदान केंद्राचे नावात बदल झालेल्या मतदान केंद्रात नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनी झालेल्या बदलाबाबतची नोंद घ्यावी. तसेच ज्या मतदान केंद्राचे मतदार यादीत आपले नाव समाविष्ट आहे. त्याच मतदान केंद्रावर 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत जावून मतदानाचा हक्क बजाविण्यात यावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले आहे.

मतदान केंद्राचे स्थानात बदल झालेल्या मतदान केंद्राचा तपशिल या प्रमाणे आहे, 50- शहापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शहापूर जुनी अंगणवाडी खोली क्र.1 ऐवजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शहापूर नवीन इमारत. 52- शहापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शहापूर जुनी अंगणवाडी खोली क्र.2 ऐवजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शहापूर नवीन इमारत. 116-भंडारा स्वामी विवेकानंद हिंदी प्राथमिक शाळा भंडारा, दक्षिण भाग खोली क्र.2 ऐवजी राष्ट्रीय विद्यालय भंडारा पश्चिमेकडील खोली क्र.1. 117-भंडारा स्वामी विवेकानंद हिंदी प्राथमिक शाळा भंडारा, पश्चिम भागातील कार्यालयाच्या बाजुकडील खोली क्र.3. ऐवजी  राष्ट्रीय विद्यालय भंडारा पुर्वेकडील खोली क्र.1.

सहाय्यकारी मतदान केंद्राचा तपशिल या प्रमाणे आहे. 66-भंडारा लालबहादुर शास्त्री हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा खोली क्र.1 ऐवजी 66 अ-भंडारा लालबहादूर शास्त्री हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा पुर्वेकडील खोली क्र.3. 71-भंडारा पंचशिल प्राथमिक शाळा भंडारा ऐवजी 71-अ-भंडारा पंचशिल प्राथमिक शाळा भंडारा पुर्वेकडील खोली.

मतदान केंद्राचे इमारतीचे नावात बदल झालेल्या मतदान केंद्राचा तपशिल या प्रमाणे आहे. 53-शहापूर स्व. जनाबाई इंग्रजी कान्वेट शाळा खोली क्र.1 शहापूर ऐवजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शहापूर. 58-भोजापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजापूर जुनी इमारत खोली क्र.1 ऐवजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजापूर, नवीन इमारत खोली क्र.1. 165-बेरोडी (पु) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  बेरोडी(पु) ऐवजी 165- बेरोडी(पु) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरोडी(पु), नवीन इमारत दक्षिणेकडील खोली क्र.1. 176-गणेशपूर ग्रामपंचायत कार्यालय गणेशपूर खोली क्र.1. ऐवजी 176-गणेशपूर मिशन हायस्कुल गणेशपूर जुनी इमारत दक्षिण भाग खोली क्र.1. 256-वाघबोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघबोडी खोली क्र.1. ऐवजी 256-वाघबोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघबोडी खोली क्र.2.