मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

गुढीपाडवा प्रवेश वाढवा;हिरडामाली शाळेची 100%नविन प्रवेश भरती

गोरेगांव,दि.6एप्रिलः-गोरेगांव पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या जि.प.पुर्व माध्यमिक शाळा हिरडामाली येथे गुढीपाडवा.प्रवेश वाढवा या उपक्रमातंर्गत इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया शंभर टक्के पुर्ण झालेली आहे.यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीआयईसीपीडीचे समन्वयक सुभाष मारवडे होते.प्रमुख पाहुने विषय तज्ञ सुनिल ठाकुर,व्यवस्थापन समीती अध्यक्ष तथा पालक राखीलाल येळे,उपाध्यक्ष महेश कुंभलकार,सदस्य प्रा.लोकेश कटरे,सदस्य दशरथ टेंभरे,सदस्य चंद्रसेन पटले,सदस्य सौ.सविता बिसेन,सदस्या सरीता बिसेन,सदस्या वंदना ठाकुर,सदस्या संगीता मसराम,सदस्या उषा राऊत ,वरीष्ठ शिक्षिका सौ.अनिता चाकाटे उपस्थित होते.प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक विरेन्द्रकुमार पटले यांनी केले.
या दरम्यान थोर पुरूषांच्या वेषभुषेत झाकी सह प्रभात फेरी काढण्यात आली,नवांगत विध्यार्थ्यांचे पुस्तके,रंगीबेरंगी फुगे,पुष्पगुच्छ व चाॅकलेट देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
पदविधर शिक्षिका नाननबाई बिसेन यांच्या प्रेरणेतुन ई.6 वी.व ई.7वी च्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता संग्रह’अक्षरधारा याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थी व पालक बहुसंख्येनी उपस्थित होते.संचालन नाननबाई बिसेन व आभार सहाय्यक शिक्षिका साधना पारधी यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी पदविधर शिक्षक सुरेशकुमार बघेले, सहाय्यक शिक्षिका छाया पारधी,पंचशिला नंदेश्वर,एकता कटरे,सौ.पटले व विद्यार्थी प्रतिनीधी यांनी सहकार्य केले.

Share