उज्ज्वला योजनेमुळे महिलांना सन्मानाचे जीवन –  शुभांगी मेंढे

0
23
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सन्मान प्रदान केला आहे. भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून महिलांसाठी अनेक उपयोगी अश्या योजना अंमलात आणल्याचे चित्र आज भारतापुढे आहे. त्यात सुकन्या योजना, मनोधैर्य योजना, उज्वला योजना, अश्या अनेक माध्यमातून महिलांना सन्मानासोबतच सक्षम करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.
 असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचार कार्यक्रमादरम्यान शुभांगी मेंढे यांनी ७ एप्रिल २०१९ रोजी गोंदिया तालुक्यात केले. शुभांगी मेंढे यांनी अनेक गावांत जाऊन प्रचार कार्यक्रम घेत असून त्यांना स्थानिक जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महिला मंडळी सुद्धा अत्यंत जोशात ‘अबकी बार फिर मोदी सरकार’ अश्या घोषणा करत शुभांगी मेंढे यांना साथ देत आहेत.