मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

नमाद महाविद्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके

गोंदिया,दि.9 : गोंदिया येथील नमाद महाविद्यालयात मतदार जागृती अभियानाअंतर्गत निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यामार्फत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रजनी चतुर्वेदी होत्या. डॉ.चतुर्वेदी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देवून 11 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी मतदान करावे असे आवाहन केले. तसेच इतरांना सुध्दा मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे सांगितले.

 तलाठी दिपक नागदेवे आणि बी.जे.पटले यांनी विद्यार्थ्यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके करुन दाखवून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष मतदान करुन घेतले. प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मंडळ अधिकारी पी.सी.शर्मा, तलाठी बी.जे.पटले यांनी निवडणूकीच्या काळात कोणत्या गोष्टीची दक्षता घ्यावी व आचारसंहितेचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या डॉ.शारदा महाजन, प्रा.चौरे, प्रा.पारधी, प्रा.मस्तान, प्रा.भोयर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Share