खोटी स्वप्न दाखवून सत्ता पिपासू मोदी सरकारला मतदारांनी मतपेटीतून धडा शिकवावा-मुंडे

0
14

अर्जूनी/मोरगाव,दि.०९ःःअच्छे दिनाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल. फसवणूक करणा?्या नरेन्द्र मोदी सरकार ला धडा शिकविण्यासाठी संधी आली आहे नव महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील जनतेने भाजपचे पराभव करुन. देशात परिवर्तनाची सुरुवात केली आहे. आता पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रफुल्ल पटेल यांची ताकद वाढवावी असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दि सात एप्रिलला अर्जूनी/मोर येथील सी.जे कंपनीच्या आवारात महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारात बोलत होते.
यावेळी खासदार मधुकर कुकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे. जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर.तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे.नगराध्यक्ष किशोर शहारे. राजेश नंदागवळी. जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालिवाल.रत्नदिप दहिवले. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे.शिंसुला हलमारे. चंद्रशेखर ठवरे.जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे.यशवंतराव परशुरामकर. राकेश लंजे. उषा शहारे. रजनी गिर्हेपूंजे.प्रोर्णिमा शहारे व ईतर मान्यवर उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. देश बदल रहा है.परंतु पाच वर्षाच्या काळात एकही बदल झालेला दिसत नाही. ऊलट खोटे आश्वासने व फसव्या घोषणा करून महागाई ने जनता त्रस्त झाली आहे. शेतक?्यांच्या आत्महत्या व बेरोजगारी वाढली आहे नव महिन्यांपूर्वी भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेस चे मधुकर कूकडे निवडून आले असून देशातील जनतेला परिवर्तन हवे असल्याचे दिसून आले आहे. नोटबंदी.स्कील इंडिया. मेकिंग इंडिया पेटड्ढोल. डिझेल चे वाढलेल्या किंमतीचा खरपुस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली मात्र मोदी व फडणवीस सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून टाकला .रोजगार हमी योजना बंद करण्याच्या मार्गावर आहेत याचा मतदार राजाला राग कसा येत नाही असा सवाल ही धनंजय मुंडे यांनी केला
याप्रसंगी चंद्रशेखर ठवरे.. राजेश नंदागवळी. ऊषा शहारे. गंगाधर परशुरामकर. भागवत नाकाडे यांनी यूपीए सरकारचे विविध पैलूंवर वाभाडे काढले.सभेचे संचालन व आभार लोकपाल गहाणे यांनी मानले.