लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठीजिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना बंद ठेवावे

0
22

गोंदिया दि.१० : उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १५ मार्च २०१९ च्या शासन परिपत्रकाद्वारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या परिच्छेद १३५(ब) नुसार राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी घोषित केलेली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाच्या ुुु.ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक २०१९०३१५१६१८३१९५१० असा आहे.
तरी गोंदिया‍ जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील विविध आस्थापना, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनेच्या मालकांनी त्यांचेकडे कार्यरत कामगारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून ११ एप्रिल २०१९ रोजी सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून) भरपगारी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. तसेच सदर सुट्टीसाठी कोणतीही वजाती किंवा कपात करण्यात येवू नये. याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अन्यथा संबंधीत आस्थापनावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याबाबत काही तक्रार असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२३६५९५ या क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. असे सहायक कामगार आयुक्त गोंदिया यांनी कळविले आहे.