मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री महाजन यांना धक्काबुक्की

जळगाव दि.१० :- – अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जोरदार राडा झाला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यातही हाणामारी झाली. मात्र या मारहाणीमागचे नेमके कारण हे समोर येऊ शकलेले नाही. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.अमळनेर येथे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांची जाहीर प्रचार सभा प्रताप मिल परिसरात बुधवारी सायंकाळी झाली. या सभेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते.स्मिता वाघ समर्थकांनी डॉ.बी.एस.पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवा, असे सांगत एकच घोषणाबाजी केली. यानंतर वाघ समर्थकांनी थेट व्यासपीठावर चढून डॉ.बी.एस.पाटील यांना मारहाण  करण्यास सुरुवात केली. मंत्री गिरीश महाजन हे सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा त्यांनाही समर्थकांनी धक्काबुक्की केली.हे मारहाण नाट्य जवळपास पाच ते सात मिनिटे सुरु होते.

Share