मुख्य बातम्या:

भाजपच्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेची हजेरी

अहमदनगर दि.१० :- विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, विखे पाटील यांनी नगर येथे भाजपाच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी याआधीच भाजपामध्ये प्रवेश केला असून, त्यांना भाजपाने नगर येथून उमेदवारी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगरला १२ एप्रिल रोजी सभा होत आहे. या सभेच्या नियोजनासाठी नगर येथे भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राधाकृष्ण विेखे पाटील यांनी उपस्थित राहत मार्गदर्शन केले. विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमवेत भाजपचे स्थानिक नेते (डावीकडून) अ‍ॅड. अभय आगरकर, खासदार दिलीप गांधी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे आदी या बैठकीला उपस्थित होते.

Share