गडचिरोली-चिमूरमध्ये अंदाजे 57 टक्के मतदान,विदर्भात मतदारामध्ये निरुत्साह

0
6

गोंदिया/गडचिरोली,दि.11ः- 17 व्या लोकसभेकरीता पहिल्या टप्यातील निवडणूकीकरीता आज 11 एप्रिलला मतदान होत आहे.त्यात विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाबाबत ३९ तक्रारी आल्या आहेत. प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. वर्धा-६, रामटेक-५, नागपूर-१२, यवतमाळ-वाशिम-४, चंद्रपूर-८, गडचिरोली-४, या लोकसभा मतदारसंघातून EVM बिघाडाबाबत तक्रारी आल्या आहेत.तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदान असलेल्या मतदान केंद्रावर सुध्दा ईव्हीएममध्ये काही काळ बिघाड आल्याने मतदान प्रभावीत झाले होते.

गोंदिया-भंडारा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 49.20 टक्के तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव,अहेरी,आरमोरी व गडचिरोली विधानसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत मतदान पार पडले.या मतदारसंघात अंदाजे 57.32  टक्के मतदान झाल्याचे जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी कळविले आहे,मतदानाची वेळ संपेपर्यंत अनेक ठिकाणी मतदार मतदान केंद्रात असल्याने अद्यापही मतदान सुरुच असल्याने अखेरचा आकडा हा 6 वाजेनंतरच स्पष्ट होणार असल्याचे म्हटले आहे..तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान 3 वाजे पार पडले. वाशिम-यवतमाळ मतदारसंघासाठीही मतदान जोमात सुरु असून वाशिम जिल्ह्यातील महिला मतदारांनी मोठ्याने सहभाग घेतला आहे.यात विशेष करुन मुस्लीम महिलांचा समावेश आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मिळून 2284 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. 6 विधानसभा मतदारसंघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सकाळपासूनच मतदानाला सुरवात झाली असली तरी 10 वाजेपर्यंत पाहिजे तसा प्रतिसाद बघावयास मिळाला नाही.तिरोडा व गोंदिया शहरातील मतदान केंद्रावरही गर्दी नव्हती.मात्र गोंदियातील काही मतदान केंद्रावर नवमतदारांनी मतदान करीत आपन देशासाठी मतदान करीत असल्याचे सांगितले तर एकोडी येथील नवमतदारला विचारणा केली असता शिक्षणासाठी मी मतदार करीत असल्याचे सांगितले यावर विद्यमान सरकारने तर शिक्षणच बंद करीत सर्व योजना बंद केल्या मग कसे करणार मतदान यावर मात्र लगेच भूमिका बदलत देशासाठी मतदान करणार असे सांगितले.यावरुन युवक जो नवमतदार आहे तो आपल्या भविष्याची शिक्षणाची नोकरीची रोजगाराबद्दलची काय योजना आहे सरकार काय करते याकडे दुर्लक्ष करीत फक्त देशप्रेम यावरच मतदान करीत असल्याचे चित्र दिसून आले,जे लोकशाहीला भविष्यात धोकादायक ठरण्याची भिती वर्तविली जात आहे.

गोंदिया व भंडारा येथील काही मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने मतदारांना त्रास झाला.निवडणुक निरिक्षक पार्थ यांनी गोंदिया शहरातील सिंधी शाळा,कुडवा जिल्हा परिषद शाळा,बीएचजे हायस्कुल वसंतनगर,एकोडी,तिरोडा शहरातील मतदान केंद्राची पाहणी केली.जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी फुलचूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.तिरोडा तालुक्यातील खमारी बूथ क्र.165 केन्द्रावर 107 वर्षीय तुरजाबाई शिवजी भांडारकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाप्रती जनजागृती व्हावी यासाठी मतदारांनी सोशल मिडियावर आपले मतदानाचे फोटो काढून व्हायरल केलेत.गोंदिया येथील नमाद महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केले.नागपूर येथील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार नागपूरात बजावला.तर गोदियात माजी आमदार राजेंद्र जैन यांनीही गोंदियात सप्तनीक मतदान केले. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सहकुटुंब मतदान केले.गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथील मतदान केंद्रावर सप्तनीक मतदान केले.या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार नाना पंचबुद्धे यांनी सह कुटुंब भंडारा शहरातील नूतन शाळेच्या केंदावर मतदान केले. तर भाजप उमदेवार सुनील मेंढे यांनी भंडारा शहरातील नूतन शाळेतील केंद्रावर मतदान केले.

भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रफुल्ल पटेल जरी या निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांनी नाना पंचबुद्धे यांना लोक निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. किसान गर्जेनेचे राजेंद्र पटले उसर्रा येथे मतदान केले.तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी आपल्या गावी खमारी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.त्यानंतर या सर्वांनी मतदारसंघातील मतदानकेंद्राकडे धाव घेत आपपल्या उमेदवारासाठी मतदान काढायला सुरवात केली.तिरोडा शहरात मात्र 1 वाजेपर्यंत पाहिजे तसा प्रतिसाद मतदान केंद्रावर दिसून आला नाही.गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ईंजि.राजकुमार बडोले यांनी मतदानाच्या दिवसी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील ईटखेडा. अर्जुनी मोर. व विविध गावातील मतदान केंद्राना भेट देवुन मतदान टक्केवारीचा आढावा घेतला. तथा कार्यकर्ते यांचेशी निवडणुक व मतदानाच्या संदर्भात चर्चा केली.

1.30 – दुपारी १ वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान, कडक उन्हातही सुरु आहे मतदान

* १२.०५ – भंडारा-गोंदिया मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १२.२० टक्के मतदान

* ११.०० – मतदान केंद्र २८१ मधील बंद मशीन बदलून मतदान सुरळीत

* 10.14 – क्रं. २८१ मतदान केंद्रात कंट्रोल युनिटमध्ये बिघाड, मतदान थांबले

* 9.37 – राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी सर्व कुटुंबासह मतदान केले. राष्ट्रवादी उमेदवार विजय होईल असा विश्वास केला व्यक्त

* 9.30 – सकाळी ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान

9.05 – बंद पडलेले व्हीव्हीपॅट मशीन सुरु करण्यात आले

* 8.55 – भाजप उमेदवार सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी केले मतदान.

* 8.53 – दोन्ही नेत्यांनी दीड लाख मतांनी जिंकण्याचा विश्वास केला व्यक्त.

* 8.47- सुनील मेंढे यांनी मतदानापूर्वी पत्नीसह बहिरेंगेश्वर मंदिर येथे जाऊन पूजा केली आणि त्यानंतर पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला

* 8.40 राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे म्हणाले, लोक भाजपच्या कामाला त्रासले असल्याने आमचा विजयी निश्चित आहे.

* ८.१५ – भंडारा शहरालगत असलेल्या कारदा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले

* 8.00 – बुथ क्रमांक २७६ मधील व्हीव्हीपॅट मशीन बदलून मतदान सुरु

* 7.20 – बुथ क्रमांक २७६ मधील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड