मुरकटडोह येथील मतदार मतदानापासून वंचित

0
21

सालेकसा,दि.12- सालेकसा तालूका हा नक्षल दृष्ट्या अतिसंवेदनशील व मागास म्हणून ओळखला जात असतो. तालुक्यातील मुरकुडोह 1,2,3, दंडारी व टेकाटोला ही गावे त्यातल्या त्यात अति मागासवर्गीय व संवेदनशील आहेत. लोकसभेच्या मतदानात या गावांना मतदानापासून वंचित राहावे लागले. प्रत्येक निवडणुकीत मुरकुडोह येथे डोंगर माथ्याच्या पलीकडे असलेल्या चार गावांसाठी मतदान केंद्र लावले जाते. मात्र यावर्षी मुरकुडोह  येथे मतदान केंद्र न लावता मतदान केंद्र क्रमांक 174 त्या गावांपासून 12 कि. मी. अंतरावर असलेल्या धनेगांव येथे लावण्यात आले. 12 कि. मी. अंतरावरील डोंगर माथ्याचा खडकाळ रस्ता पार करून आम्ही मतदान करणार तरी कसा असा सवाल शासनापुढे निर्माण करून त्या गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार केला.मुरकुडोह एक-दोन-तीन, टेकाटोला व दंडारी या पाच गावांमध्ये एकूण 600 मतदार संख्या असून फक्त दोन मतदारांनी चुकून मतदान केले. त्या 2 मतदारांना मतदानावर बहिष्कार असल्याचे माहीत नसून त्यांनी मतदान केले अशी सूत्रांकडून माहिती पुढे आली आहे.