भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत ६८.२७ टक्के मतदान

0
13

 १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी बजावला हक्क
 गोंदिया विधान सभा क्षेत्रात सर्वात कमी मतदान
 साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान

गोंदिया, दि.१२. : ११-भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी ६८.२७ टक्के असून १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख २६ हजार ७४९ पुरुष तर ६ लाख ८ हजार १४७ महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वांत कमी ६४.४१ टक्के मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात झाले तर सर्वाधिक ७१.६५ टक्के मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात झाले. सर्वाधिक मतदान साकोली विधानसभा मतदारसंघात  ७१.६५ टक्के तरी सर्वात कमी मतदान गोंदिया विधानसभा मतदारसंघात  ६४.४१ टक्के झाले आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान
तुमसर-३५८ मतदान केंद्रावर २ लाख ९९ हजार ३४५ मतदारापैकी २ लाख १० हजार ३११ मतदारांनी मतदान केले. यात १ लाख ८ हजार ६१६ पुरुष व १ लाख १ हजार ६९५ महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ७०.२६ ऐवढी आहे.
भंडारा-४५८ मतदान केंद्रावर ३ लाख ६७ हजार ७५८ मतदारापैकी २ लाख ४१ हजार ८४४ मतदारांनी मतदान केले. यात १ लाख २४ हजार ४९९ पुरुष व १ लाख १७ हजार ३४५ महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ६५.७६ ऐवढी आहे.
साकोली-३९५ मतदान केंद्रावर ३ लाख १६ हजार ४०४ मतदारापैकी २ लाख २६ हजार ६९९ मतदारांनी मतदान केले. यात १ लाख १५ हजार ४२९ पुरुष व १ लाख ११ हजार २७० महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ७१.६५ ऐवढी आहे.
अर्जूनी मोरगाव-३१७ मतदान केंद्रावर २ लाख ५२ हजार ७८८ मतदारापैकी १लाख ८० हजार ५२० मतदारांनी मतदान केले. यात ९० हजार ९७६ पुरुष व ८९ हजार ५४४ महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ७१.४१ ऐवढी आहे.
तिरोडा-२९५ मतदान केंद्रावर २ लाख ५४ हजार ७०१ मतदारापैकी १ लाख ७० हजार ८५९ मतदारांनी मतदान केले. यात ८४ हजार ९३१ पुरुष व ८५ हजार ९२८ महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ६७.०८ ऐवढी आहे.

गोंदिया-३६१ मतदान केंद्रावर ३ लाख १७ हजार ७३८ मतदारापैकी २ लाख ४ हजार ६६३ मतदारांनी मतदान केले. यात १ लाख २ हजार २९८ पुरुष व १ लाख २ हजार ३६५ महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ६४.४१ ऐवढी आहे.
एकूण ६ विधानसभा मतदार संघातील २१८४ मतदान केंद्रावर १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख २६ हजार ७४९ पुरुष व ६ लाख ८ हजार १४७ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान करणाऱ्या पुरुष मतदारांची टक्केवारी ६९.२३ तर महिला मतदारांची टक्केवारी ६७.३१ टक्के आहे.