बिजीडब्ल्यू हॉस्पिटल येथील MJFJAY कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती साजरी

0
22

गोंदिया:- स्थानिक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय (BGW) येथील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालयात राष्ट्रपीता महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना विभाग, शासकीय रक्तपेढी विभाग व संविधान बचाव कृती संघाच्या वतीने संयुक्तरित्या आयोजित या जयंती कार्यक्रमाला संविधान बचाव कृती संघाचे संयोजक अतुल सतदेवे, डॉ. सुवर्णा हुबेकर, शासकीय रक्तपेढ़ी जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाने, वैकुंठ कंप्यूटर्स चे संचालक देशपांडे सर, डॉ. हरिश भोंगाडे, ओबिसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, युवा बहुजन मंचचे सुनिल भोंगाडे, रवी भांडारकर, संतोष वैद्य, जिवनलाल शरणागत, आदी प्रामुख्याने उपस्थीत होते. याप्रसंगी अतुल सतदेवे यानी महात्मा फुल्यांचे शिक्षणविषयक विचार व त्यांनी समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली, बिजीडब्ल्यू हॉस्पिटलच्या वैद्यकीय चिकित्सक डॉ. सुवर्णा हुबेकर यानी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने बद्दल माहिती देताना सांगितले की या शासकीय योजनेत आम जनते करिता विम्याची सोय करण्यात आली आहे आणि अनेक रोगासंबंधी आर्थिक सह्योग या योजने मार्फत करण्यात येत असुन अधिकाधीक नागरिकानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. उपस्थीत सर्व मान्यवरानी आपआपले विचार व्यक्त करताना जयंती प्रित्यर्थ शब्दसुमनाने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बीजीडब्ल्यू हॉस्पिटल येथे कार्यरत असलेली जोडपी शुभम मेश्राम आणि दिपिका यानी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात सेवाकार्य करण्याचा संकल्प घेऊन नुकतेच विवाह केले म्हणून त्यांचे, तसेच जागोजागी जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी संविधान कृती संघाचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले, तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्यालयाला महात्मा फुल्यांचे तैलचीत्र फोटो संविधान बचाव कृती संघ ओबिसी संघर्ष कृती समिती, युवा बहुजन मंच यांच्या संयुंक्त विद्यामाने सुनिल भोंगाडे व कैलाश भेलावे, अतुल सतदेवे, अनिल गोंडाने यानी सप्रेंम भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थीत सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करित सध्या रक्तपेढ़ीत रक्ताचा पूरेसा साठा नसल्याने रक्तदान करण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाने यानी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पडावे म्हणून जन आरोग्य विभागाचे अनुप नेवारे, अर्चना नेवारे आणि बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय ओपीड़ी परिसर कर्मचारीवृन्द यानी अथक प्रयास केले. राष्ट्रपीता महात्मा फुले जयंती प्रसंगी उपस्थीताना मिठाई वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.