यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 61.09 टक्के मतदान

0
16

यवतमाळ, दि. 12 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या पहिल्या टप्प्यात 14- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाकरीता मतदान झाले. 11 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 61.09 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात सर्वाधिक 69.91 टक्के मतदान राळेगाव विधानसभा मतदासंघातील आहे.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात वाशिम, कारंजा, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस आणि पुसद या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लक्ष 14 हजार 785 मतदार आहेत. यापैकी 11 लक्ष 69 हजार 806 मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला. ही टक्केवारी एकूण मतदारांच्या 61.09 ऐवढी आहे. मतदान करणा-यांमध्ये 6 लक्ष 22 हजार 174 पुरुष मतदार तर 5 लक्ष 47 हजार 630 महिला मतदार आहेत. याशिवाय दोन इतर मतदारांनीसुध्दा मतदानात भाग घेऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघासाठी 34 – वाशिम विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 8 हजार 583 मतदारांनी (60.40 टक्के) मतदान केले. 35 – कारंजा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 71 हजार 584 (57.45 टक्के), 77 – राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांच्या सर्वाधिक 1 लक्ष 96 हजार 758 (69.91 टक्के), 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 5 हजार 386 (54.12 टक्के), 79 – दिग्रस विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 7 हजार 248 (64.69 टक्के) तर 81 – पुसद विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 80 हजार 247 (62.27 टक्के) मतदारांनी मतदान केले. यावेळेस पहिल्यांदाच मतदारांनी व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने मतदान केले आहे. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.