सूर्यादेव मांडोदेवी देवस्थानात आज सर्वजातीय सामूहिक विवाह

0
17

गोरेगाव,दि.13 : तालुक्यातील बघेडा येथील श्री. सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती तर्फे चैत्र नवरात्री (रामनवमी) निमित्त शनिवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर सर्वजातीय सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, सामूहिक विवाह ही काळाची गरज असून सर्वजातीय विवाह सोहळ्याचे हे २७ वे वर्ष आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव सर्वजातीय सामूहिक विवाह यज्ञाचे सुध्दा आयोजन करण्यत आले आहे. या वर्षी ५१ जोडप्यांनी लग्नासाठी नोंदणी केली असून शासनाच्या नियमांची पूर्तता त्यांनी केल्यास त्यांना १0 हजार रुपयांचे अनुदानचा लाभ घेता येणार आहे. तसेच चैत्र नवमीनिमित्त १ हजार १५१ ज्योती कलशाची स्थापना करण्यात आली आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नववधू वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष भैय्यालाल सिंदराम, सचिव विनोद अग्रवाल (सचिव), कोषाध्यक्ष मुन्नाभाऊ असाटी (कोषाध्यक्ष), सामुहिक विवाह समितीचे अध्यक्ष सीताराम अग्रवाल, ज्योती कलश समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, कुसन घासले, प्रेमलाल धावडे, पुजारी पंडित अयोध्यादास व श्री. सुयार्देव मांडोदेवी देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेले आहे.