मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

ताडोबातील वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर,दि.13: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये अडकल्याने शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील खातोडा कोअर झोनमध्ये २ वर्षांची ही वाघीण मृतावस्थेत आढळली. ती तारेच्या कुंपणात अडकली होती.  शनिवारी पहाटे ही घटना समोर आली असून या भागातील वन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. यात मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. आर. प्रवीण यांच्यासह अनेक वनअधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.

Share