बंदोबस्ताच्या नावावर पोलिसांची पिळवणूक,गट 15 नागपूर ई कंपनीच्या जवांनात रोष

0
26

गोंदिया,दि.13ः- भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरक्षेकरीता गट 15 गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाणेंतर्गत नेमण्यात आले होते.सदर भाग नक्षलग्रस्त असल्याने जवांनानी मतदानाच्यावेळी चोख बंदोबस्तात कुठलीही चुक राहू नये याकरीता सतर्क राहून सेवा बजावली.त्यानंतर 11 एप्रीलला मतदानसंपल्यानंतर लगेच 6 वाजताच पुणे येथील बंदोबस्ताकरीता जवांनाना रवाना करण्यात आले.निवडणुक कार्य पाडून बोरगाव कँप येथे पोचताच 5 मिनिटाची विश्रांती न घेऊ देता पुणे ग्रामीण बंदोबस्ताकरीता निघण्याचे आदेश देण्यात आल्याने या जवांनाना रात्रभर प्रवास करण्याची वेळ आली,त्यातच त्यांच्या पोटातही अन्न न गेल्याने भुकेल्या पोटी त्यांना प्रवास करावा लागला.चिचगडवरुन निघालेले या पोलिसांच्या गाड्या राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा लाड येथे सकाळी 4 वाजेच्या सुमारास पोचताच थोड्यावेळ जवांनानी तेथील एका पेट्रोलपंपावर विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला.सकाळच्या सुमारास प्रांतविधी करायला कंपनी नायकानी वेळ न देताच 6 वाजेच्या सुमारास पुण्याकरीता पोलीस वाहन निघाले.11 तारखेला सायकांळी 6 वाजेनिघालेल्या या पोलीस जवांनाना मात्र 13 तारखेच्या दुपारी 1 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा नास्ता किंवा जेवण उपलब्ध करुन दिले गेले नसल्याचे तसेच 3 दिवसापासून झोप झाली नसल्याने आमची प्रकृती ढासळत असल्याची भावना सोशल मिडियाच्या माध्यमातून या जवांनानी गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.पोलीस जवांनाच्या राहण्याचीजेवणाची व्यवस्था न करताच या ई कंपनीचे नायक पोलीस उपनिरिक्षक विश्वास हे रजेवर निघून गेले,कंपनी नायक विश्वास यांना परिस्थीतीची जाणिव करुन दिल्यानंतरही त्यांनी तुम्ही काहीही करा माझी तक्रार मी कुणाला घाबरत नाही असे बोलून या कंपनीतील पोलीस जवांनाना जनावरासारंखी वागणूक दिल्याचे त्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आल्याने बंदोबस्तासाठी येणार्या पोलीसांचे काय हाल होत असतील याचे हे विदारक चित्रणच म्हणावे लागणार आहे.यासंदर्भात गोंदिया पोलीस अधिक्षक विनिता साहू यांच्याशी अधिक माहिती घेण्याकरीता संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने याबाबत त्यांची भूमिका कळू शकली नाही.यांसदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्यासोबतच असते असे सांगितले.त्यातच ही कपंनी रात्रीला ८ वाजता गोंदिया जिल्ह्यातून बुलडाणाकरीता रवाना झाल्याचे सुत्रानी सांगितले.कंपनी बुलडानाकरीता रवाना झालेली असताना पुणेग्रामीणचा उल्लेख जवानांनी का केला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.