गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी उद्या फेरमतदान

0
19

गडचिरोली,दि.14ः-गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात वाटेली, गारडेवाडा, गारडेवाडा (पुस्कोटी), गारडेवाडा (वांगेतुरी) येथे १५ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ३ या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. गट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खोली क्रमांक एक मध्ये वाटेलीसाठी,खोली क्रमांक २ मध्ये, गारडेवाडासाठी खोली क्रमांक ३ मध्ये गारडेवाडा (पुस्कोटी), खोली क्रमांक ४ मध्ये गारडेवाडा(वांगेतुरी)साठी मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.