खामखुरा येथे सात दिवशीय पाणपोईची व्यवस्था

0
16

अर्जुनी मोरगाव,दि.14ः- तालुक्यातील खामखुरा येथे १३ ते १९एप्रिल २०१९ पर्यंत स्थानिक सार्वजनिक विठ्ठल रुखमाई मंदिरात श्रीमद भागवत ज्ञानय‌ज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या ज्ञानय‌ज्ञ सप्ताह कार्यक्रमाचे भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीच्या उदात्त हेतु ठेवून ,दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा येथील युवाशक्ती ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा सात दिवसीय पाणपोईची व्यवस्था करण्यात आली या पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक सीतारामजी नेवारे प्रमुख अतिथी म्हणून सुभाषजी मेश्राम,शिवदासजी नकाते,निर्मलाबाई राऊत, संतोषजी कोड्रडे ,रामदासजी ठाकरे ,धनराज
कोड्डे,जनार्धन जांभुळकर, जनार्धन कोड्डे,मनोहर सोनवाने,संदीप जांभुळकर ,गोपाल शहारे, विठ्ठल कोंडडे, पुरुषोत्तम मानकर.
• युवाशक्ती ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था अध्यक्ष निपल बरैया,उपाध्यक्ष मोरेश्वर संग्रामे, सचिव गुरुदेव डोंगरवर, कोशाध्यक्ष कृष्णा पारधी सदस्यगण अशोक ठाकरे, अनिल बघमारे,मुकेश गजापुरे,मंगेश राऊत , योगेश कासार ,विठ्ठल कांबळी ,मिलिंद येलपूरे ,लंकेश कोडडे,सागर सयाम, प्रशांत कोड्डे इतर सदस्यगण उपस्थित होते. पाणपोई व गाव संपाईसाठी सहकार्य करीत आहेत. याप्रसंगी प्रास्ताविक संस्था अध्यक्ष निप्पल बरैया यांनी आमची युवाशक्ती ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था सदैव समाजकार्यासाठी व गाव विकासासाठी प्रयत्न करत राहील व सदस्य प्रयत्नरत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे संचालन संस्था सचिव गुरुदेव डोंगरवार तर आभार प्रदर्शन अशोक ठाकरे यांनी मानले .