शेतकऱ्यांचे हालाहाल.तर व्यापारी मात्र मालामाल

0
24

संतोष रोकडे/अर्जूनी/मोर,दि.14ःःपुर्व विर्दभातील गोंदिया. भंडारा गडचिरोली. चंद्रपूर या जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिक खरीप हंगामात तसेच सिंचन सोय असल्यास रब्बी हंगामात सुद्धा काही ठिकाणी धानपिक उत्पादन घेतले जाते. धानाला भाववाढ मिळण्याची आशा मावळल्यामुळे शेतकऱ्यांना पडेल भावात धान विकावा लागला. काही दिवसांत भाववाढ झाल्याने व्यापारी मालामाल तर शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.
धानाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकरी धानाची लागवड करतात. चार वर्षांपूर्वी धानाला अडीच हजार प्रतीक्विंटल भाव होता. वास्तविक शासनाचा हमीभाव १७५० रुपये प्रतीक्विंटल असताना व्यापार्यांनी या भावात धान खरेदी केली नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागतो. शेतकऱ्यांनी बाजारात धान विकल्यावर राज्य शासनाने केंद्रावर धान विक़ी करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला. त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच झाला. आता भाववाढ होण्याची शक्यता नसल्याने नव्वद टक्के शेतकऱ्यांनी कमी भावात धान विकला. अलीकडे प्रतीक्विंटल १५० ते २०० रुपये भाववाढ झाल्याने केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
मोठे व्यापारी. कारखानदार. साठवणूकदारांकडे धान साठवून ठेवला असल्याने त्यांना लाखो रुपयांचा फायदा तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर व्यापारी उद्दोग उभारुन भरमसाठ नफा कमावीत आहेत. शासनाने कितीही योजना आखल्या. आयोग बसविले. सवलती जाहीर केलेल्या तरी शेतकऱ्यांची परिस्थिती पालटेल असे दिसून येत नाही.
क्रुषि कंपनीचे एजंट गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आमचा माल वापरा .तूम्हाला फायदा होईल अशी आश्वासने देतात. मात्र शेतकरी नागवला जात आहे. शेतकऱ्यांना कुणीही वाली नसल्याने व्यापार्याचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांजवळ भौतिक साधने उपलब्ध नसल्याने पिकांचे उत्पादन खर्च निघणे कठीण होते आहे. शेतकऱ्यांची सुशिक्षित मुले बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. मुलांसह मुलींच्या लग्नाचा व्यश्न शेतकऱ्यांपुढे आवासुन उभा आहे. निसर्ग साथ देत देत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने खेड्यापाड्यात शेतमालावर आधारित उद्योग सुरु करावे. सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शेत तलावाचे नियोजन करून दिर्घकालीन पाणी समस्या निकाली काढावी. शेती उपयोगी सवलती वर भर दिल्यास तरुण पिढीला रोजगार उपलब्ध होईल. शासन अशी रोजगार निर्मिती करण्यात लक्ष देईल काय?असे म्हणतच जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणी मसिहा जन्माला येईल का?या विवंचनेत जीवन जगत आहेत