मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

राजुर्‍यात वसतिगृहातील मुलींवर अत्याचार

चंद्रपूर,दि.15ः-राजुरा शहरातील प्रसिद्ध इन्फंट जिजस इंग्लिश मिडियम स्कूल येथे शिकणार्‍या व त्याच संस्थेच्या वसतिगृहात राहात असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचा प्रकार शनिवारी समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी लिपिकाची चौकशी केली असून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा स्थित इन्फंट जिजस हायस्कूलच्या वसतिगृहातील मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केला आहे. अत्याचार झाल्याचा संशय असलेल्या दोन अल्पवयीन मुली सध्या चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे १३0 आदिवासी मुली या वसतिगृहात आहेत. मात्र, यातील सात-आठ मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या मुलींची वारंवार तब्येत बिघडत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले जात होते. मात्र, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मुलींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना इथे हलविण्यात आले. त्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटली. र्मदानी महिला आस्था मंचच्या महिला पदाधिकार्‍यांना याची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. या मुलींची भेट घेऊन विचारपूस केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शोभाताई फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, या मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केला जात होता. त्यामुळे बेशुद्धावस्थेत घडलेल्या अत्याचाराबद्दल या मुलींना काहीच माहीत नाही. अत्याचार कुणी केला, हेही त्यांना माहीत नाही. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
र्मदानी महिला आस्था मंचने तक्रार देताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली, त्यांनी मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र, चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इन्फंट जिजस हायस्कूल मध्ये जो प्रकार घडला त्याचा निषेध मात्र सर्वत्र केला जात आहे, त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रकरणाची विचारणा करण्यास अनेक संस्था, राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटना जात आहेत, पण तेथील स्थानिक पोलिस प्रशासन त्यांना भेटण्यास मनाई करीत आहे.

Share