मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

पळसगाव (डव्वा) येथे पाणी टंचाई

सडक अर्जुनी,दि.15ः- तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्ण पणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी टंचाईची समस्या दूर करण्याची मागणी सरपंच डॉ. भुमेश्वर पटले, उपसरपंच हिरालाल चवारे, ग्रामपंचायत सदस्य सेवक बागडे, हिरामन तुमडाम, प्रमोद वैद्य, सिंधू जांभुळकर, प्रमिला कोकोडे, मेश्राम, झामेश्वरी, बाबुलाल रंगारी, रामचरण राऊत, राजाराम मेश्राम यांनी केली आहे.
पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत मुंढरीटोला, आकारटोली, कुंभारटोली, माताटोली या गावांचा समावेश आहे. या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारावर आहे. गावात १८ बोअरवेल, ७ विहिरी आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने गावकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागीलवर्षी सुध्दा गावकºयांना याच कालावधीत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. तेव्हा सरपंच डॉ. भुमेश्वर पटले, उपसरपंच हिरालाल चवारे यांनी पुढाकार घेवून गावकºयांना टँकरने पाणी पुरवठा केला होता. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पळसगाव ग्रामपंचायतला भेट देवून पाणी टंचाईचा आढावा घेतला होता. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना पळसगाव येथे दोन बोअरवेल खोदण्याचे निर्देश दिले होते. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अद्यापही बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले नसल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. माताटोली, पळसगाव येथे १ बोअरवेल असून तेथील पाणी काही प्रमाणात पाईप लाईनद्वारे टाकीत सोडून वाटप केले जाते. गावात पाणी टंचाई असल्याने बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर यावरुन बरेचदा वाद सुध्दा होत आहेत.

Share