मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

मुख्यमंत्र्यांच्या सभेत प्रकल्पग्रस्तांना मारहाण

अमरावती,दि.15 : शासन – प्रशासन प्रलंबित समस्यांची दखल घेत नसल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना रविवारी सायंकाळी काळे झेंडे दाखविले. त्यावेळी भाजपसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मारहाण केल्याने गोंधळ माजला. युतीच्या प्रचारार्थ रविवारी स्थानिक नेहरू मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा होती. सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुख्यमंत्री बोलण्यास उभे होताच विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने सभामंडपातच काळे झेंडे दाखविले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा, अशा घोषणा त्यांनी दिल्या. दरम्यान युतीचे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे धावले व त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मारहाण केली. यात सभामंडपात चांगलाच गोंधळ माजला. पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजपक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व अन्य पदाधिकाऱ्यांनी हा गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत प्रकल्पग्रस्तापैकी एक असलेल्या पंकज वाघाडे याला अधिक मार लागला. पोलिसांनी मनोज चव्हाण, विकास राणे, प्रमोद भाकरे, सुनील भाकरे आदी चार ते पाच प्रकल्पबाधितांना ताब्यात घेऊन परतवाडा ठाण्यात आणले. आम्हाला नुसते आश्वासन दिले. आमच्याशी चर्चा केल्या. मात्र न्याय मिळाला नाही, सबब, आम्ही काळे झेंडे दाखविल्याची प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी व्यक्त केली.

Share