मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

अज्ञात आजाराने दोन सख्या बहिणींचा मृत्यू

तुमसर,दि.15 : अज्ञात आजाराने दोन सख्खा बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे रविवारी सकाळी घडली. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली. स्वाती रामदयाल शरणागत (१३) आणि खुशी रामदयाल शरणागत (१०) रा. झेंडा चौक सिहोरा अशी मृत बहिणींची नावे आहेत. सिहोरा गावापासून दोन किलोमिटर अंतरावर मांगली गावात रामदयाल शरणागत वास्तव्याला आहे. त्यांना चार मुली आहेत. मांगली येथे पत्नी व दोनमुलींसह राहतात. तर स्वाती आणि खुशी या दोन मुली सिहोरा येथील आजी अनंताबाई यांच्याकडे राहत होत्या. शनिवारी गावात श्रीरामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत स्वाती आणि खुशीने डोक्यावर कलश घेवून सहभाग घेतला. त्यानंतर महाप्रसाद घेवून त्या घरी परतल्या. तर झेंडा चौकात एका विवाह समारंभात त्या दोघी बहिणी सहभागी झाल्या. घरी परतल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलटी आणि हगवणीचा त्रास सुरु झाला. त्यांचा आवाज निघणेही बंद झाला. त्यांना गावातील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
स्वाती हे महाराष्टÑ हायस्कूल नवव्या वर्गात तर खुशी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चवथ्या वर्गात शिकत होती. तुमसर येथे उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह रवाना करण्यात आले होते. सभापती धनेंद्र तुरकर, मांगलीचे सरपंच प्रभाकर पारधी यांनी शरणागत कुटूंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.

Share