मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

ट्रकचालकांना लुटणारा सराईत जेरबंद

वर्धा,दि.15 : धोत्रा शिवारात ट्रकचालकाची हत्या करून ट्रकचालकाकडील रोख व इतर मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या दहा तासात जेरबंद केले आहे. राहूल भीमण्णा पवार (१९) रा. हिंगणघाट असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो कर्नाटक राष्ट्रातील यादगिरी येथील मुळ रहिवासी आहे.विशेष म्हणजे सदर आरोपीला यापूर्वी हत्येसह रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणे व चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून तो इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. धोत्रा शिवारातील घटनेनंतर दोन चमू तयार करून तपासाला गती देण्यात आली. माहितीच्या आधारे राहूल पवार याला येणोरा पारधी बेड्यावरून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून तपास सुरू असल्याची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  निलेश ब्राह्मणे यांनी सांगितले.

Share