मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवा- दीपक कुमार मीना

वाशिम, दि. १५ : प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम राबवितांना सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद शासकीय यंत्रणेकडे होऊन त्यला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने आगामी प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आज केल्या. ६ ते १९ मे २०१९ दरम्यान राबविल्या जाणाऱ्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेडाऊ तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. मीना म्हणाले, मोहीम काळात शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये व इतर माध्यमातून क्षयरुग्णांची माहिती संकलित करण्यात यावी. तसेच घरोघरी जावून क्षयरुग्णांचा शोध घ्यावा. या मोहिमेदरम्यान आढळून येणाऱ्या प्रत्येक क्षयरुग्णाला नियमानुसार उपचार सुरु करून त्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच प्रत्येक क्षयरुग्ण व्यवस्थित औषधोपचार घेत आहे किंवा कसे, याबाबत नोंदी ठेवण्यात याव्यात. तसेच क्षयरुग्ण शोध मोहिमेत आढळलेल्या व पूर्ण औषधोपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची माहिती सुध्दा सातत्याने अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला असणे, दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस ताप असणे, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट असणे, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडत असणे, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास संबंधितांनी नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जावून तपासणी करून घ्यावी. सर्व आरोग्य संस्थांमध्ये मोफत थुंकी नमुना तपासणी, क्ष-किरण तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीबीनॅट मशीनद्वारे तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांना मोफत उपचार सर्व शासकीय संस्थानामध्ये उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. आहेर यांनी यावेळी दिली.

Share