डाॅ.आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीचे अनुकरणीय उपक्रम

0
20

गोेंदिया,दि.17ः- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती,गोंदिया, यंग चॅलेजर स्टडी ग्रुप गोंदिया व सहयोग संघठन गोंदियाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित विविध उपक्रमा दरम्यान जयस्तंभ चौकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाषगार्डन,डॉ.आंबेडकर पुतळ्यापासून सुभाष शाळा व संपूर्ण तहसिल कार्यालयात पसरलेली घाण व केरकचरा स्वच्छ करून शहरात आगळा वेगळा आदर्श सादर करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती गोंदिया शहरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.शहराच्या विविध भागातून रॅलीचे आयोजन केले जाते.या सर्व रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येतात व त्यांच्याकडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन केले जाते.

या रॅलीत सहभागी होणाèया भीम सैनिकासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने शहरात तसेच जयस्तंभ चौकापासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सुभाष स्कुल मैदान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते सुभाष उधान या मार्गावर थंड पाणी,शरबत,अल्पोहार यांचे स्टाल लावले जातात एक प्रकारे या परिसराला जत्रेचे स्वरूपच प्राप्त होते.सहाजिकच यामुळे या संपुर्ण परिसरात घाण पसरते या घाणीचा इतरांना त्रास होऊ नये या व्यापक व उदात दृष्टीकोन ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जंयती उत्सव समिती,यंग चॅलेंजर स्टडी ग्रुप व सहयोग संघटनेच्या वतीने आज १५ एप्रिल रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला या सफाई अभियानात समितीचे अध्यक्ष नीलेश देशभ्रतार,अनिल सुखदेवे,नागरत्न बनसोड, विनित सहारे,अनिल सुखदेवे,लक्ष्मीकांत डहाटे,सुशील ठवरे,शैलेश टेंभेकर,नीलेश कांबले,प्रंशात डोंगरे,राहुल राऊत,प्रतीक बसोंड,आकाश इंदुलकर व समितीचे इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.समितीच्या या उपक्रमाची शहरात चर्चा होती.