मुख्य बातम्या:
राजनांदगावच्या कंपनीला ५0 लाखांचा ठोठावला दंड# #टंचाईच्या २६४ उपाययोजनांच्या कामांना मान्यता# #प्रलंबित मागण्यांसाठी विज्युक्टाचे निवेदन# #जबरानजोत शेतकर्‍यांचा धडक मोर्चा# #विशाल हृदयी , विविध आयामी : डॉ विशाल बिसेन# #राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री# #इंडियन ऑईलच्या सामाजिक दायित्वातून आज दिव्यांगाना मिळणार सहायक उपकरणे# #गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित# #मुंबई, पुणे व नागपूर महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्याचा निर्णय- शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती# #दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध- चंद्रकांत पाटील

माळी समाज सामुहिक विवाह सोहळयात १० जोडपी विवाहबद्ध

तुमसर,दि.17ः- महात्मा ज्योतीबा फुले बहू. विकास मंडळ तुमसरचे वतीने माळी समाज सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन दि. १४ एप्रिल रोजी माळी समाज सभागृह डोेंगरला तुमसर येथे उत्साहात पार पडले. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार शिशुपाल पटले, काँग्रेस नेते प्रमोद तितिरमारे, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेश पारधी, डाॅ.विजया नांदुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कारेमोरे, विठ्ठल कहालकर, सभापती रेखाताई ठाकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, अरविंद कारेमोरे तसेच मान्यवर मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवर मंडळींच्या वतीने लग्न बंधनात अडकलेल्या नवविवाहितांना भेट वस्तूंचे वितरण करण्यात आले. माळी समाजबांधवांच्या वतीने आयोजीत विवाह सोहळयात एकूण १० जोडपी विवाहबद्ध झाली. सामुहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असून त्यामुळे वर व वधू पित्यांच्या खर्चात बचत होते. कर्जबाजारीपणाचे प्रमाण कमी होवून जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र मिळतो. सर्व समाज बांधवांनी सुद्धा असेच विवाह सोहळे आयोजीत करून समाजासमोर आदर्श निर्माण करावे, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

Share