मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

पालिकेच्या कंत्राटदाराची नालीबांधकामात अनियमितता

गोंदिया,दि.17ः- नगर पालिकेच्यावतीने गेल्या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या निधीतून चौरागडे मेडिकल स्केव्अर ते पटले किराणा दुकानापर्यंतच्या सांडपाणी वाहून जाणाèया नालीचे बांधकाम गेल्या जानेवारी महिन्यापासून हाती घेण्यात आले आहे.नालीबांधकाम करताना मात्र कुठलेही योग्य नियोजन नसल्याचे स्पष्ट जाणवते.त्यातच ज्याठिकाणी सध्या नालीचे बांधकाम करण्यात येत आहे तो भाग पांदण रस्त्याच्या असल्याचे बोलले जाते.मात्र हा पांदण रस्ता किती फुटाचा होता याची नोंद नसल्याने नगरपालिकाही जसे बनेल तसे काम करू लागले आहे.
नगरपरिषदेने रस्ता आणि नालीचे अंतर नक्की करून बांधकाम करण्यास सुरवात केली तर चौकातील चौरागडे मेडिकल दुकान पुर्णतःया बांधकामात येण्याची शक्यता आहे.सोबतच त्याजवळील वडाचे झाड आणि इतर बांधकाम सुद्धा.सांडपाण्याचे नियोजन करायचे असेल तर पालिकेला या सर्व बांधकामांना नोटीस देऊन आधी हटवावे लागेल.परंतु असे काहीही केल्याचे दिसून येत नाही.त्यातच डोलारे यांच्या घरासमोरील हितेश बिसेन व पारधी यांच्या रिकाम्या प्लॉटमध्ये नाली बांधकाम करताना कंत्राटदाराने काही अंतर आत घेतले होते.परंतु जमीन मालकांनी आपल्या प्लॉटची बाजू सोडून बांधकाम करण्यास संमती दाखविली असली तरी पुढे ही नाली सरकेल काय हा प्रश्नही उपस्थित झालेला आहे.
कुठलेही बांधकाम म्हटले की अभियंत्याची भेट असायलाच पाहिजे परंतु गोंदिया नगर पालिकेतील अभियंते हे कधीच बांधकामाच्या ठिकाणी जात नसल्याचे आजपर्यंतचे अनुभव आहे.त्यामुळेच रस्ता बांधकाम असो की नाली बांधकाम हे कंत्राटदार आपल्या मनमर्जिने व धाकाच्या बळावरच करीत असल्याने शहरातील बांधकाम निधीची विल्हेवाट लावून कंत्राटदारासह अभियंत्याचेच पोषण होते की काय असे वाटू लागले आहे.या भागातील अनेक बांधकाम हळूहळू उखडायला लागले तर सध्या सुरू असलेले नालीचे बांधकामही पाहिजे त्या गुणवत्तेचे दिसून येत नाही.या अगोदरही या बांधकामासंदर्भात नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली होती परंतु कुणीही लक्ष दिले नव्हते.
नालीबांधकाम करताना पालिकेने रिकामे प्लॉटधारकांसह पक्के बांधकाम केलेल्या नागरिकांचे काही बांधकाम नालीकरीता पाडले.परंतु हे बांधकाम पाडताना ते अतिक्रमण होते की काय हे स्पष्ट केलेले दिसून येत नाही.तर रस्त्यापासून ५ फुटापर्यंतच का पाडण्यात आल्याने ते अतिक्रमण होते असे समजल्यास ते कसे कंत्राटदाराने व अभियंत्याने गृहीत धरून बांधकाम तोडायला लावले असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
या नालीबांधकामाचे कंत्राट हे धीरज जेठानी यांना असून त्यांनी इतर कंत्राटदाराला हे काम विकल्याचे बोलले जात आहे.या बांधकामासाठी मुख्यरस्त्यापासून नालीचे बांधकाम करताना कंत्राटदाराने त्या नालीचे सरळीकरण कुठेच केलेले नाही.याउलट हितेश बिसेन व श्री पारधी यांच्या मालकीच्या रिकाम्या असलेल्या प्लॉटमध्ये अधिक खोदकाम करून नालीचे बांधकाम सुरू केले होते.परंतु जेव्हा बिसेन यांनी आक्षेप घेत मोजणी केली तेव्हा बांधकाम हे तीन ते चार फूट आतमध्ये असल्याचे समोर आले.तेव्हा प्लाटधारकाची जागा सोडून बांधकाम करा काहीही आक्षेप नसल्याचे प्लाटधारकांनी सांगितल्यानंतर त्यानुसार हे काम सुरू व्हायला हवे होते.परंतु तसे अद्यापही झालेले नाही.त्यातच या बांधकामासाठी मुख्य रस्त्यावर ठेवलेल्या साहित्यामुळेही वाहनधारकांसह सर्वसामान्यांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.पटले किराणा दुकानापासून या नालीचे बांधकाम करताना वाहून जाणारे पाणी जाईल की नाही याचेही नियोजन केलेले नाही.उलट नाली बांधकाम सरळ न करता पक्के बांधकाम व सुरक्षा qभत वाचविण्यासाठीच कंत्राटदाराने आटोकाट प्रयत्न करून रिकाम्या प्लाटधारकांचे नुकसान करण्याचे काम तर केले नाही ना अशा चर्चांना उधाण आले आहे.

Share