मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

अतिक्रमणधारकांपुढे पालिकेचे लोटागंण; नाल्यांवर बांधकाम

गोंदिया,दि.17: शहरात अतिक्रमणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाèयांच्या आदेशानेच अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. परंतु, चांदणी चौकात अतिक्रमणधारी व्यापाèयांनी पोलिस कर्मचारी, पत्रकार आणि नगर परिषदेच्या कर्मचाèयांवर हल्ला केल्याने मोहिमच थांबवली गेली.त्यानंतर परत ही मोहिम राबविण्यात आली. तरीही रस्त्यावरील अतिक्रमण काही हटलेले नाहीत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्षांनीच शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे व्हावे असे वाटरत नसावे. म्हृणूनच अतिक्रमण हटाव मोहिम नावापुरती राबविली जात आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणत होते तत्काळ अतिक्रमण हटवा तर नगराध्यक्ष म्हणतात वेळ द्या,मुख्ङ्माधिकारी म्हणाले मार्किंग करुन अतिक्रमण हटवणार असे म्हणत वर्ष-दीड वर्षाचा काळ लोटून गेला मात्र अतिक्रमण काही हटले नाही. यावरुन नगरपालिकेची मूळात इच्छाच अतिक्रमण हटविण्ङ्माची नसून निव्वळ वेळकाढू धोरण राबविणेच नव्हे तर अतिक्रमणधारकापुंढे विविध कारणे पुढे करुन लोटागंण घालण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे.
चांदणी चौकातील अतिक्रमणधारी व्यापाèयांनी गुंडगर्दी कशी सुरु केली याचे उदाहरणच बघावयास मिळाले.अशा लोकांना समोर करुन राजकीय नेते सर्वसामान्यांचे मात्र अतिक्रमण तोडून त्यांना उघड्यावर आणते.अशा पालिकेतील व विधानसभेतील राजकीय नेत्याना आणि जे अतिक्रमणधारकांची बाजू घेतात त्यांनाही सर्वसामान्ङ्मजनतेनेच धडा शिकवायला हवा.कारण हे पैसेवाले व्यापारी व नेत्याची जी हुजूरी करणारे पालिकेचे अधिकारीच अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देत असल्याचे या मोहिमेवरुन दिसून आले.
जिल्हाधिकारी यांनीच शहरातील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते.कांहीनी तर गोंदिया नगरपरिषदेच्या अतिक्रमणकत्र्यांना जो बळ मिळत आहे,त्याविरोधातच हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुध्दा केली आहे.नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यापाèयांनी सात दिवसात अतिक्रमण हटवावे,असे म्हटले होते.सात दिवस लोटूनही त्ङ्मांच्ङ्माकडे कुणीही लक्ष दिले असे दिसून ङ्मेत नाही.मार्किंग करणार असे म्हटले जात होते परंतु ‘ार्किंगच केली गेली नाही.म्हणे एसडीओ मार्किंग करुन देणार रस्ते तु‘चे जागा तु‘ची सर्वच ठाऊक असताना एसडीओची वाट म्हणजे पळवाटा शोधण्ङ्मासारखेच झाले आङे.
तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अतिक्रमण ताबडतोब हटलेच पाहिजे, असे फर्माण सोडत पोलिस विभागाला जेवढा बंदोबस्त लागेल तेवढा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.तरीही त्ङ्मांचे पालिका प्रशासनाने एैकले नाही. आता तरी विद्यमान जिल्हाधिकारी शहरातील अतिक्रमण हटविण्ङ्मासाठी पुढाकार घेणार की फक्त कागदोपत्री शासन निर्णय दाखवा म्हणत शहराच्या अतिक्रमण मोहिमेला खिळ बसविणार याकडे लक्ष लागले आहे.
शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या वर पोहोचली आहे.याच शहरातील गोरेलाल चौकातील रस्त्यावर व नाल्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे गांधीप्रतिमेकडून गोरेलाल चौकाकडे हाटेल बिंदल प्लाझाला जेव्हा आग लागली तेव्हा अग्निशमन गाड्यांना जातांना त्रास सहन झाला होता. दिल्ली होटलकडे जाणाèङ्मा गल्लीत,शंकर गल्लीतही अतिक्रमण झाले आहे.खुद्द नगरपरिषद कार्यालयासमोरील दुकानांनी नालीवर दुकाने थाटली आहेत.
रेलटोली परिसरातील शौचालङ्माच्ङ्मा जागेवर अतिक्रमण करुन कुणी दुकाने थाटली तर स्टेडीयम मागच्या भागातही काही नेत्यांनी अतिक्रमण केले आहे.जयस्तंभ चौकातील पेट्रोलपंपाच्ङ्मा मागील नालीवर अतिक्रमण करुन दुकान थाटले गेले परंतु कुणाच्या डोळ््यात दिसत नाही की अधिकारी व पदाधिकारी पैसासमोर आंधळे झाले अशी म्हणण्ङ्माची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे याच मार्गावर शहरातील खुप समाजसेवी आहेत,जे इतरांना समाजसेवेसह अनेक गोष्टींची जाणीव करुन देण्यासाठी नेहमीच होर्डींगच्ङ्मा माध्ङ्मातून म्हणा,निवेदनातून पुढे असतात,त्यांनी मात्र आपल्या दुकान व घरासमोरील नालीवरील अतिक्रमण हटवून हा रस्ता मोकळा करुन देऊ यासाठी कधी पुढाकार घेण्याचे सौजन्य दाखविले नाही.
गांधी प्रतिमा चौक, जयस्तंभ चौक, मनोहर चौक, चांदणी चौक, भाजी बाजार, कपडा लाइन, प्रीतम चौक, लोहा लाइन, नाव्ही लाइन, लेबर चौक यासह इतरही चौकात व्यापाèयांनी मोठी दुकानदारी थाटली आहे. भर रस्त्यावर दुकानातील साहित्य मांडत आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होतोच शिवाय नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे.
शारदा वाचनालयाच्या समोरील रस्ता बघितल्यास त्या रस्तावर वाहनांच्या माध्यमातून कुणी अतिक्रण केले,कुणी सामान ठेवून कसा रस्ता अडविला याचे चित्र उघडया डोळ्यानी दिसते, परंतु कुठलाही नगरसेवकच काय आमदार खासदार बोलायला तयार नाही.त्यामुळे गोंदिया शहरातील वाढत्या अतिक्रमणाला पदाधिकारीच प्रोत्साहन देऊन बसल्याने शहर अतिक्रमणाच्या विळख्यात चालला आहे.

Share