मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

आल्लापल्ली येथे अवैध प्रवाशी वाहनाला भीषण अपघातः तीन ठार

तालवाडा जवळील घटना

गडचिरोली,दि.17 –  सकाळच्या सुमारास आल्लापल्लीहून भामरागडच्या आठवडी बाजाराकरिता निघालेल्या महिंद्रा पिकअप  (क्र. एम एच ३४ एम ३७२८) आणि पेरमिली (मांड्रा) येथील अवैध प्रवाशी वाहन  या दोन वाहनात झालेल्या भीषण धडकेल तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज बुधवारी (दि.17) रोजी आल्लापल्ली नजीक घडली.
मृतकामध्ये दोन महिला व एक पुरुष यांचा समावेश असून मृतांचे नाव अद्याप कळू शकले नाही. याच अवैध प्रवासीवाहन मधील अन्य 11 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 
आल्लापल्लीवरून भामरागडच्या आठवडी बाजारासाठी निघालेले महिंद्रा पिकअप हे आल्लापल्ली नजीक पोचताच विरुद्ध दिशेने येणारी अवैध प्रवाशी वाहन यांच्यात जोरदार धडक झाली. भरधाव वेगात असलेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी असलेल्या अवैध प्रवाशी वाहनावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे. या अपघातामध्ये नाहक तिघांचा बळी गेला असून अन्य अकरा जखमींवर अहेरीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघातामधील मालवाहू ही नागेपल्ली येथील शिंदे तर  अवैध प्रवाशी वाहन हे पेरमली (मांड्रा) येथील सुनील सुरमवार यांच्या मालकीची असल्याचे कळते.
अहेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या मेमोवरून अहेरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. यावेळी असिफ पठाण, प्रमोद आत्राम सरपंच पेरमिली, वंजा गावडे यांनी अपघात ग्रस्तांना प्राथमिक उपचाराकरिता मदत केली आहे.
Share