मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

१० लोकसभा जागांवर उद्या मतदान, २० हजार मतदान केंद्र सज्ज

मुंबई,दि.17: राज्यात दहा मतदारसंघात गुरुवारी 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी आज रवाना झाले. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. याव्यतिरिक्त बुलढाणा मतदारसंघात 12 उमेदवार, अकोला 11, अमरावती 24,  हिंगोली 28, नांदेड 14,  परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

15 पेक्षा जास्त उमेदवार असलेले 4 मतदार संघ असून यापैकी बीड मतदार संघात एका कंट्रोल युनिटमागे 3 बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदार संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य 6 मतदार संघात प्रत्येकी 1 बॅलेट युनिट लागणार आहेत.  या निवडणुकीसाठी 62 हजार 700 ईव्हीएम तर सुमारे 27 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

बुलढाणा- 1979 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 59 हजार), अकोला – 2085 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 61 हजार), अमरावती – 2000 मतदान केंद्र, (एकूण मतदार 18 लाख 30 हजार), हिंगोली- 1997 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 32 हजार), नांदेड – 2028 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 18 हजार), परभणी – 2174 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 84 हजार), बीड – 2325 मतदान केंद्र (एकूण मतदार 20 लाख 41 हजार), उस्मानाबाद – 2127 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 86 हजार), लातूर – 2075 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 83 हजार), सोलापूर – 1926 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 50 हजार).

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

Share