एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन

0
9

गोरेगाव,दि.18ः- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे शिक्षकांचे एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून अनिता रहांगडाले तसेच प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक ओ.टी.रहांगडाले हे उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपस्थित प्रशिक्षकांनी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कशाप्रकारे करता येईल यावर मार्गदर्शन केले. काळाची गरज म्हणून इंग्रजी बोलण्याकडे विद्यार्थ्यांना कसे वळवता येईल तसेच कशाप्रकरची शिक्षणप्रणाली वापरता येईल यावर विशेष भर दिला. हे शिक्षक प्रशिक्षणाला  आर डी कटरे सचिव तुलशी शिक्षण संस्था गोरेगाव, सौ छाया मेश्राम प्राचार्य मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.