रामनवमीच्या मुहर्तावर मांडोबाई देवस्थानात ५१ जोडपी विवाहबद्ध

0
17

गोरेगाव,दि.18ः- तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या जंगलातील मांडोबाई देवस्थानात दरवर्षीप्रमाणे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमीचे मुहर्त साधून सामुहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाली.यावेळी प्रामुख्याने ना . राजकुमारजी बडोले, आमदार संजय पुराम, माजी आमदार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी खासदार खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर चंद्रिकापुरे, सभापती विश्वजित डोंगरे, जि . प. सदस्य जियालाल पंधरे आणि ज्योतीताई वालदे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी केले.

पाहुुणे म्हणून यावेळी माजी सभापती दिलीप चौधरी,डॉ. जितेंद्र मेंढे,पत्रकार संघाचे अध्यक्ष हौसलाल रहांगडाले,सरपंच मुनेश रहांगडाले,भेंडारकर ताई (सरपंच तेढा ), सामूहिक विविह समितीचे अध्यक्ष सितारामजी अग्रवाल उपस्थित होते. आयोजन यशस्वीतेसाठी दिलीप खंडेलवाल, गिरिधारी बघेल, काशिनाथ भेंडारकर, भंडारी जी (हलबी टोला ), प्रेमलाल धावडे,नरेंद्र भट , पंडित अयोध्यादास पुजारी, किशोर शेंडे, उर्मिलाबाई ब्राह्मणकर, बलदेव चौधरी, श्यामराव ब्राह्मणकर यांनी परिश्रम घेतले. मंच संचालन समितीचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले तसेच आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष भैय्यालाल सिंदराम यांनी मानले.

वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबातील लोकांना आपल्या मुला-मुलींचे विवाह सोहळा थाटात माटात करणे परवडत नाही. मांडोबाई देवस्थानच्यावतीने मागील २७ वर्षांपासून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुके, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि झारखंड राज्यातील जोडपी यानिमित्ताने विवाहबंधनात अडकली.देवस्थानच्यावतीने नवदांपत्यांना ५ भांडी आणि इतर सामग्रीदेखील देण्यात आली. विवाह सोहळ्याला १५ हजारांवर वऱ्हाड्यांनी हजेरी लावली होती. ‘लाखो भाविकांचे श्रद्धास्थान’, अशी ओळख असलेल्या या मांडोबाई देवस्थानात ७०० पेक्षा जास्त जोडपी दरवर्षी विवाह करतात असे अग्रवाल यांनी सांगितले.