सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान

0
18

अर्जुनी मोरगाव,दि.19ः- तालुक्यातील सिरेगाव बांध येथे(दि.18) गुरुवारला भागवत सप्ताह निमित्य स्मार्टग्राम ग्रामपंचायत तथा छत्रपती श्री शिवाजी राजे ग्रुप सिरेगाव बांधच्या संयुक्त  उपक्रमा अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी सिरेगाव बांधचे सरपंच इंजि.हेमकृष्ण संग्रामे यांनी सपत्नीक रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली.तसेच रक्तदान शिबिरामध्ये ग्राम सेवक टी. टी. निमजे,रोजगार सेवक अरविंद कापगते,संगणक परिचालक मनराज पचारे, ग्राम पंचायत परिचर शामराव उईके सह ग्रामपंचायत कर्मचारी तथा छत्रपती शिवाजे राजे ग्रुप च्या सर्व सदस्यांनी आणि हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष लोकपाल घाणे यांनी सपत्नीक रक्तदान केले.तसेच गावकरी मिळून एकूण 30 रक्त दात्यांनी रक्तदान केले.रक्त संकलन करण्याचे कार्य गंगाबाई रुग्णालय गोंदियाच्या चमूने केले.स्मार्टग्राम ग्रामपंचायत सिरेगावबांध च्या वतीने यशस्वीरित्या शिबीर पार पाडून सर्व रक्तदान करणाऱ्यांचे खूप कौतुक करण्यात आले.