मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

वाशिम जिल्हा परिषद पदभरती ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी परीक्षा शुल्काची रक्कम भरण्याचे आवाहन

वाशिम, दि. १९ : वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता जाहिरात जिल्हा परिषदेच्या www.zpwashim.in व www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळांवर २ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर १७ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या शुद्धीपत्रकानुसार सर्व पदांकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास २३ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 सद्यस्थितीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांनी सुद्धा अद्याप आपले परीक्षा शुल्काची रक्कम भरलेली नसून परीक्षा शुल्क भरण्याचा वेग मंदावला आहे. ज्या उमेदवारांनी पदभरतीकरिता यापूर्वीच ऑनलाईन अर्ज भरलेल्या आहे, त्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता परीक्षा शुल्काची रक्कम लवकरात लवकर भरावी, असे आवाहन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना व उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी केले आहे.
Share