अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
27
नांदेड दि.20- नांदेड क्लब  व यशवंत कॉलेज येथील टेनिस मैदानावर दिनांक १५ एप्रिल ते दिनांक १९ एप्रिल २०१९ दरम्यान नांदेड डिस्ट्रीक्ट अँड सिटी लॉन टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित योनेक्स सनराईस १६ वर्षाखालील मुले व मुलींच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या अंतिम एकेरी सामन्यात इंदौरच्या दीप मुनीम याने मुंबईच्या साहेबसिंग सोडी याच्यावर सरळ दोन सेट मध्ये ६-३,६-३ ने मात करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या अंतिम एकेरी सामन्यात तामिळनाडूच्या लक्ष्मीप्रभा अरुणकुमार हिने महाराष्ट्राच्या साई भोयर हीच सरळ दोन सेट मध्ये ६-२, ६-३ ने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 
मुलांच्या अंतिम दुहेरी सामन्यात इंदौरच्या दीप मुनीम व पुण्याच्या यशराज दळवी या जोडीने पुण्याच्याच प्रसाद इंगे व औरंगाबाद च्या ओम काकड यांचा सरळ दोन सेट मध्ये ६-२, ६-३ असा प्रभाव करून दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
 मुलींच्या दुहेरी अंतिम सामन्यात हैद्राबादच्या अपूर्वा वेमुरी व अभया वेमुरी या जुळ्या भगिनींनी नागपूरच्या साई भोयर व पुण्याच्या इशिता जाधव यांचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात तीन सेट मध्ये ६-४, ६-७, (३) १०-७ असा पराभव केला. व दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेनंतर लगेचच झालेल्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड शहराचे माजी महापौर श्री अजयसिंह बिसेन, दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शंतनू डोईफोडे, यशवंत कॉलेजचे क्रीडा विभागाचे संचालक मनोज पैंजणे, महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनचे काउन्सिल मेम्बर ए के पंजवानी, व नांदेड डिस्ट्रीक्त अँड सिटी लॉन टेनिस असोसिएशनचे खजिनदार डॉ किशोर विडेकर, यांची उपस्थिती होती.विजेत्यांना व उपविजेत्याना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेला ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे रे फ्री म्हणून कोलकात्याचे श्री सुरजीत बंदोपाध्याय यांची नेमणूक झाली होती. त्यांनी हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका पार पडली.
बक्षिस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ अमोल पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन स्पर्धेचे संचालक शिवानंद विडेकर यांनी केले