२५ एप्रिल जागतिक हिवताप दिन हिवतापाला झिरो करु, आपल्यापासून सुरुवात करु

0
142

गोंदिया,दि.२० : हिवताप आजाराला कारणीभूत प्लाजामोडीयम परोपजीवीचा मानवामध्ये प्रसार ?नाफीलीस जातीच्या मादी डासांमार्फत होतो. दरवर्षी जनतेमध्ये हिवतापाबाबत जनजागृतीस्तव जागतिक स्तरावर २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हिवताप आजाराकरीता पारेषण काळ जवळ येत असून सदर आजार बळावण्यापासून बचावाकरीता पुर्वतयारी म्हणून सदर दिवस साजरा करण्यात येतो. जून-जुलै महिन्यापासून पावसाची सुरुवात झाली असता डासांच्या घनतेत ब?्याच प्रमाणात वाढ होते. कारण त्यांच्या वाढीकरीता पोषक असे वातावरण असल्यामुळे पावसाच्या साचलेल्या पाण्यात डास खुप मोठ्या प्रमाणात अंडी घालतात व त्यांचे घनतेत ब?्याच प्रमाणात वाढ होते.
सन २०१६-२०१८ पर्यंतची हिवताप आजाराची जिल्हा हिवताप कार्यालय गोंदिया येथील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
वर्ष           तपासलेले रक्त नमुने    हिवताप आजाराने दुषित आढळून आलेले रक्त रमुने
२०१६                   ४९५२८६                                            ९२०
२०१७                    ४४५२३०                                          ६७९
२०१८                    ४२०७२५                                           ३००
गोंदिया जिल्हा हा हिवतापाकरीता अतिसंवेदनशील जिल्हा असून हिवताप या आजाराचे बरेच रुग्ण आढळून येतात. गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून जिल्ह्यात जंगली वसाहत सुध्दा भरपुर प्रमाणात आढळून येते. केंद्र शासनाच्या भारतामध्ये २०१६-२०३० पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे लक्ष पाहता आरोग्य विभागामार्फत सदर जागतिक हिवताप दिन ही मोहिम २५ एप्रिल एवढा एकच दिवस जनजागृती करुन न थांबता संपुर्ण सप्ताह २५ एप्रिल ते ३० एप्रिल २०१९ हा हिवताप जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.
२५ एप्रिल ते ३० एप्रिल २०१९ या संपुर्ण आठवड्यात वर्तमानपत्रात लेख, शाळेतील विद्याथ्र्यांच्या रॅलीचे आयोजन, उत्कृष्ठ काम असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचा?्यांचे सत्कार, जनतेमध्ये हिवतापाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधी आरोग्य शिक्षण, तछकउछ ची सभा, बसस्थानक/बाजार इतर गर्दीच्या ठिकाणी जनतेमध्ये हिवतापाबाबत जनजागृतीकरीता बॅनर, पोस्टर, पोस्टर्स वितरीत करणे इत्यादी सदर या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यावर्षीचे जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य ‘‘हिवतापाला झिरो करु, माझ्यापासून सुरुवात करुङ्कङ्क असून सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता जनतेचे सहकार्य अनिवार्य आहे.
कोणताही ताप अंगावर काहाळू नये. ताप आले असता त्वरीत आपले जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून रक्त नमूना तपासून घ्यावे व समुळ उपचार करुन घ्यावा. आपले परिसर स्वच्छ ठेवावे. पावसाचे पाणी साचून राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. खराब झालेले टायर, माठ, रांजन, डब्बे इत्यादी कोणतेही वस्तू ज्यामध्ये पावसाचे पाणी साचू शकते उघड्यावर ठेवू नये. नाल्यातील पाणी वाहते करावे. आपल्या घरी आरोग्य विभागामार्फत आलेल्या आरोग्य कर्मचा?्यांना सहकार्य करावे. तरी सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता जनतेनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.