सामूहिक सोहळ्यात १४ जोडपी विवाहबद्ध

0
10

मोहाडी,दि.21ः- श्री हनुमान देवस्थान समिती व गावकर्‍यांच्या सहकार्याने हनुमान जयंतीच्या शुभदिनी बेटाळा येथे आयोजित सर्वधर्म शुभमंगल सामूहिक विवाह सोहळ्यात १४ जोडपी विवाहबद्ध झाली.
सकाळी ४ वाजता हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात अभिषेक करण्यात आले. सकाळी १0.३0 वाजता हभप जयसिंग कस्तुरे महाराज यांचे गोपालकाल्यानिमित्तजाहीर किर्तन झाले. ठिक ११ वाजता हभप पांडुरंग शेंडे महाराज, अडेगाव यांचे वाणीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मंगलाष्टकावर विवाह सोहळा पार पडला. जि. प. पूर्व माध्यमिक शाळा येथील जानोसास्थळावरून एकाचवेळी नवरदेवांची लग्नस्थळापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. मधुकर कुकडे, आ. चरण वाघमारे, नाना पंचबुध्दे, माजी आ. अनिल बावनकर, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, जि. प. सदस्या सरिता चौरागडे, सभापती विशाखा बांडेबुचे, जि. प. सदस्य के. के. पंचबुधे, राजू माटे, माजी जि.प. सदस्य बाबू ठवकर, दिक्षीत पटेल, विठ्ठल कहालकर, सरपंच नरेश ईश्‍वरकर, पत्रकार सुनिल मेर्शाम, राकाँ नेते राजू कारेमोरे, हंसराज आगासे, निशीकांत इलमे, प्रमिला साकुरे, प्रमोद तितिरमारे व इतर मान्यवर उपस्थित होते. विवाह सोहळ्यानंतर प्रत्येक जोडप्याला जीवनोपयोगी ५ भांडे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन कुंभलकर, उपाध्यक्ष विनोद भाजीपाले, सचिव नरेश राऊत व संचालकांनी सहकार्यकेले.