भागवत सप्ताहातून महापुरुषांचे विचार पेरले जातात-ना.बडोले

0
18

अर्जुनी मोर,दि.२१ः-गावागावात होणारे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण होऊन संस्काराची प्रेरणा प्रत्येकाला मिळते. या भागवत कथामुळे गावांची एकता व अखंडता मजबूत होते. देवी-देवतांचे व थोर महापुरुषांचे विचार या माध्यमातून जनमानसात पेरले जातात. तर या माध्यमातून होणाèया सामुहिक विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यांना सामाजिक कार्याची नवी उर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.
ते सार्वजनिक श्री हनुमान मंदिर टड्ढस्ट खामखुरा (हेटी) द्वारा भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळयाच बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, प्रवचनकार हभप कन्याकुमारी भाऊराव चांदेकर, इंद्रदास झिलपे, बुरडे, सरपंच डॉ. अजय अंबादे, पो.पा. जयप्रकाश लाडे, मंडळाचे अध्यक्ष विजय दुनेदार, उपसरपंच धनंजय दुनेदार, ग्रापं सदस्य राधेश्याम नंदेश्?वर, उद्धव मुंगमोडे, ललीता दुनेदार, नमीता राऊत, रमाकांत मेर्शाम, भाग्यश्री सयाम, शितल लाडे, मधुकर दुनेदार, रामदास भुरखे, राजेंद्र ठाकरे, नुतन सोनवाने, व्यंकट खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
हभप कन्याकुमारी चांदेकर यांनी आपल्या अमृत वाणीतून ग्रामवासीयांना सप्ताहाभर मंत्रमुग्ध केले. या भागवत सप्ताहाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे तीन जोडप्यांचे सामुहिक विवाहसुद्धा पार पाडण्यात आले. यावेळी ना. राजकुमार बडोले यांनी नवदाम्पत्यांना त्यांचे भावी जीवन सुखी समृद्ध जाण्यासाठी आशीर्वाद देऊन भेटवस्तू ही दिल्या. संचालन लुनकरण झोडे यांनी तर आभार मनोहर सोनवाने यांनी मानले.
या कार्यक्रमाला खामखुरा व परिसरातील ग्रामवासीयांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान मंदिर टड्ढस्ट खामखुरा येथील पदाधिकारी व ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले.