कन्यादान योजनेचे अनुदान वाढविणार – ना. बडोले

0
21

– मांडोदेवी येथे सामुहिक विवाह सोहळा
– ३४ जोडपे विवाहबद्ध
गोंदिया- सामुहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असून मोठे सेवाकार्य आहे. मांडोदेवी येथे मागील २३ वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू असून येथील सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळा प्रसिद्ध आहे. सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध जोडप्यांना सध्या १० हजार रूपये अनुदान कन्यादान योजनेतून शासनातर्फे दिले जातात. सामाजिक न्याय विभागाकडून या योजनेच्या जाचक अटी शिथील करून अनुदानात वाढ करून २५ हजार रूपये देण्याचा विचार असल्याचे, वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान समिती बघेडा तर्फे रामनवमीच्या दिवशी आयोजित सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्याचा प्रमुख अतिथी पदावरून बोलत होते. यावेळी मंचावर प्रामुख्याने आमदार गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. खोमेश रहांगडाले, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सभापती मोरेश्वर कटरे, डॉ. अंशु सैनी, अ‍ॅड. नामदेव किरसान, हनुवत वट्टी, झामqसग बघेले, संतोष चव्हाण, नंदू बिसेन, भरत क्षत्रीय, लिखेंद्र बिसेन, तहसीलदार शिल्पा सोनाले, तहसीलदार भंडारी, हौसलाल रहांगडाले, दिनदयाल चौरागडे, नंदकिशोर असाटी, डॉ. जितेंद्र मेंढे, नारायण बहेकार, ओक्टो ताराम, युवराज रहांगडाले, झुम्मक बिसेन, दुलिचंद बघेले, माणिक पारधी, प्रदीप ठाकूर, छत्रपाल तुरकर, अमित झा, संजय मुरकुटे, पंकज सोनवाने धनंजय रिनाईत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. बडोले म्हणाले, श्री मांडोदेवी देवस्थानाचा विकासाकरीता निधीची कमी पडू देणार नाही. हे क्षेत्र धार्मिकदृष्टया महत्व ठेवून असून परिसरातील लाभलेल्या निसर्गामुळे मोठे पर्यटनस्थळ झाले आहे. त्यामुळे या स्थळाच्या सर्वोत्परी विकासाची जबाबदारी आमची आहे. तसेच जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकèयांनी धान दरासाठी निराश होण्याची आवश्यकता नाही, शासन याबाबतीत गंभीर आहे. लवकरच या बाबतीत शासनाकडून ठोस निर्णय घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले. आ. संजय पुराम यांनी, आपण या क्षेत्राचा विकासाकरीता कटिबद्ध असल्याचे सांगितले. मांडोदेवी समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी संचालन करतांना मांडोदेवी देवस्थानाकरीता शासनाला ५ कोटींची मागणी केली. तसेच कन्यादान योजनेचा अनुदानात वाढ करण्याची मागणी करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. विवाह समारंभाचे स्वस्ती वाचन पं. अयोध्यादास पुजारी व त्यांच्या चमूने केली. मंगलाष्टके नारायण बहेकार यांनी गायले. जोडप्यांना संस्थेतर्फे जीवनोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. जेवण व्यवस्थापन कार्य संजय गांधी विद्यालयाच्या कर्मचाèयांनी पाहिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्थेचे सचिव विनोद अग्रवाल यांनी मानले.विशेष म्हणजे, कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित ना. बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना संस्थेतर्फे शुभेच्छा देण्यात आले. सामुहिक विवाह सोहळ्याचा यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष भैय्यालाल qसद्राम, कुसन घासले, सिताराम अग्रवाल, डॉ. लक्ष्मण भगत, दिलीप चौधरी, हुकूमचंद अग्रवाल, मुन्ना असाटी, चंद्रशेखर बोपचे, अशोक देशमुख, धुर्वराज पटले, देवेंद्र तामसेटवार, सखाराम qसद्राम, शालीकराम हुकरे, योगराज धुर्वे, प्रेमलाल धावडे, रामदास ब्राम्हणकर, श्यामराव ब्राम्हणकर, किशोर शेंडे, दिलीप खंडेलवाल, उमेश सेवूत, महेश घासले, पोषण मडावी, ग्रामसेवक कुबडे, शिवा सरोटे, प्रकाश शिवणकर, गिरधारी बघेले, गुड्डू पटले, रोहित अग्रवाल, राहुल अग्रवाल, हेमंत भुते, टोपराम बहेकार, महेंद्र मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.
फोटो-
०००००००००००००००००