बाबरी मशीद प्रकरणी अडवाणींसह २० जणांना नोटीस

0
14

नवी दिल्ली- बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ’क्लीन चिट’ दिलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह २० जणांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोटीस पाठविली आहे. तसेच या प्रकरणात या नेत्यांना क्लीन चीट दिल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) चार आठवड्यांत उत्तर देण्यास न्यायालयाने बजावले आहे.
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी २२ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने अडवाणींसह भाजपाच्या प्रमुख नेतेमंडळींना बाबरी मशीद पाडल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. या निकालाला आव्हान देणारी याचिका फैजाबादमधील रहिवासी हाजी मेहमदू अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने २० जणांना नोटीस बजावली आहे. तसेच या नेत्यांना ‘क्लीन चिट’ दिल्याबद्दल सीबीआयकडूनही खुलासा मागितला आहे.