“वाह…क्या बात है..!!! पाजी तुस्सी कमाल कर दिता वे” म्हणत अमिताभ बच्चन यांनी केली दिलेर मेहंदी यांची प्रशंसा

0
23
दिलेर मेहंदी आणि सपना चौधरी यांची नवीन प्रस्तुती, ‘बावली तारेड’ झालं वायरल
भांगडा किंग आणि  इंडी-पॉप जगाचे प्रसिद्ध गायक दिलेर मेहंदी यांचे नवीन गाणे, ‘बावली तारेड’ हे  टी-सीरीज संगीत लेबल च्या अंतर्गत रिलीज़ केले गेले. वायरल झालेले हे गीत त्यांच्या प्रशसंकांनच्या खास पसंती पडत आहे. या बहुप्रतिक्षित गाण्याबरोबर प्रथमच दलेर मेहंदी आणि हरियाणवी नर्तकी सपना चौधरी एकत्र आपल्यासमोर आले आहेत. दलेर मेहंदी, जे त्यांच्या उत्साही नृत्य गाण्यांसाठी, विशिष्ट आवाज, पगडीसाठी आणि आकर्षक कपड्यांसाठी ओळखले जातात यांची असंख्य गाणी आजवर श्रोत्यांच्या पसंतीस आली असून हे देखील त्यापैकीच एक आहे.
ह्या गाण्याबद्दलची घोषणा त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन केली. सोशल मीडियाच्या आधारे त्यांनी त्यांच्या गाण्याची पहिली धून त्यांच्या अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचविली.  प्रतिभावंत दलेर मेहंदी यांनी आपल्या ट्विटरवर “आता प्रतीक्षा संपली, #BawliTared ही गरमागरम प्रस्तुती फक्त तुमच्यासाठी आहे, तुमचा दलेर मेहंदी आणि सपना चौधरी तुम्हाला नवीन जगात घेऊन जाण्यासाठी आलो आहेत. ह्याचा आनंद घ्या, शेअर करा आणि त्याबद्दल लिहा. प्रेम! रब राखा.” अशा प्रकारची पोस्ट केलेली आहे. 
एक दिवसापुर्वी रिलीज झालेले ‘बावली तारेड’ हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहे, एका दिवसात १०,००० हून अधिक लाइक्स आणि सुमारे ४ लाख हिट्स आहेत. एवढेच नव्हे तर महानायक अमिताभ बच्चन यांना देखील हे गाणे खूप आवडले. “वाह…क्या बात है..!!! पाजी तुस्सी कमाल कर दिता वे” अशा शब्दांत त्यांनी आपल्या अधिकृत सोशल ट्विटर खात्यावर कौतुक केले.
यापूर्वी दलेर मेहंदी आणि अमिताभ बच्चन यांनी  ‘मृत्युदाता” या चित्रपटात एकत्र काम केले होते, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी एक प्रसिद्ध सर्जनची  भूमिका निभावली होती. ह्या चित्रपटाच्या यशासाठी एक गाणे कारणीभूत ठरले जे दलित मेहेंदी आणि आणि अमिताभ वर चित्रित झाले आहे, ‘ना ना ना रे’ हे ते गाजलेले गाणे जे सुदेश भोसले सह दलेर मेहंदी ने गायले आहे हे जास्त आठवडे चॅटबस्टर वर होते. 
‘बावली तारेड’ गाण्याचे बोल दलेर मेहंदी यांनी कृष्णा भारद्वाज सह लिहले आहेत तर दलेर मेहंदी आणि सपना चौधरी यांच्या आवाजात ते स्वरबद्ध केलेले आहे. सुमित भारद्वाज यांनी गाण्याचे दिग्दर्शन आणि पवन चावला यांनी निर्मिती केलेली आहे.