शेतकèयांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा-डॉ.कादंबरी बलकवडे

0
14

गोंदिया,दि.३० : जिल्ह्यातील शेतकèयांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करुन शेतकèयांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम सन २०१९-२० च्या आढावा सभेत डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उपनिबंधक श्री.कांबळे, प्रभारी कृषि विकास अधिकारी झामसिंग टेंभरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे म्हणाल्या, राष्ट्रीयकृत सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकèयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी मागणी केलेल्या शेतकèयांच्या कृषिपंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी. जिल्ह्यातील जे शेतकरी शेतीमध्ये विविधप्रकारचे प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेतात त्यांच्या यशोगाथा इतर शेतकèयांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.नाईनवाड यांनी सन २०१८-१९ या वर्षात खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देवून खरीप हंगाम सन २०१९-२० या वर्षाचे नियोजन सादर केले. सन २०१८-१९ या वर्षात ११३४.२ मि.मी. पाऊस झाला. याच वर्षात खरीप पेरणी २ लाख ४६३ हेक्टरवर, रब्बी पेरणी २५ हजार ७८१ हेक्टरवर आणि उन्हाळी पेरणी २४ हजार २५९ हेक्टरवर झाल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम सन २०१९-२० या वर्षासाठी महाबीज व खाजगी कंपन्यांकडून भात पिकाचे ६२ हजार ५४० क्विंटल, तूर पिकाचे १८६ क्विंटल आणि ढेंचा व इतर पिकाचे १०६ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. सन २०१९-२० करीता रासायनिक खताची मागणी ७१ हजार ५५ मे.टन इतकी करण्यात आली आहे. मागील वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१ हजार १०३ शेतकèयांना १०८ कोटी ७५ लक्ष रुपये, ग्रामीण बँकेने ५ हजार ९०१ सभासदांना २१ कोटी १५ लक्ष तर राष्ट्रीयकृत बँकांनी ७० कोटी ३६ लक्ष इतके कर्जवाटप केले. तर सन २०१९-२० या वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २७ हजार ९९८ शेतकèयांना ११० कोटी, ग्रामीण बँकेला ५ हजार ३१० शेतकèयांना २५ कोटी ३२ लक्ष आणि राष्ट्रीयकृत बँकांना ९४ कोटी ६८ लक्ष असे एकूण २३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
सन २०१८-१९ या वर्षात ५९५ कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून सन २०१९-२० या वर्षात २७९२ कृषिपंपांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
बाघ आणि इटियाडोह प्रकल्पातून सन २०१८-१९ या वर्षात २९ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून सन २०१९-२० या वर्षात २८ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पातून मागील वर्षात ८ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी ९ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. लघु सिंचन (स्थानिक स्तर) प्रकल्पाच्या १७ प्रकल्पातून मागीलवर्षी ४६९ हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी १५६० हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषदेच्या २ हजार ६९ लघु प्रकल्पातून आणि १४२१ माजी मालगुजारी तलावातून २९ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी लघु प्रकल्पातून २३ हजार १७१ हेक्टर आणि माजी मालगुजारी तलावातून २४ हजार ५२ हेक्टर असे एकूण ४७ हजार २२३ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गोंदिया पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या ६८ प्रकल्पातून ३३ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील विविध प्रकल्पाच्या माध्यमातून १ लाख ६ हजार हेक्टर सिंचन करण्यात आले तर यावर्षी १ लाख २१ हजार १९६ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १०० धान खरेदी केंद्रावरुन सन २०१८-१९ च्या खरीप हंगामात ८५ हजार ६८३ शेतक?्यांकडून २७ लक्ष ४९ हजार ८७९ इतका धान खरेदी करण्यात आला असून त्याची किंमत ४७४ कोटी ५७ लक्ष इतकी आहे. कृषि विभागाच्या विविध योजनेअंतर्गत सन २०१९-२० यावर्षाचा प्रस्तावित लक्षांक देण्यात आला आहे. सन २०१८-१९ या वर्षात कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतक?्यांना ४३२ टड्ढॅक्टर आणि ३१२ भात मळणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, भात कापणी यंत्र व भात मील देण्यात आले आहे. या दोन्ही बाबीवर ६ कोटी ९१ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे.
सन २०१९-२० या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत १५० क्रॉपसॅप सलग्न शेतीशाळा घेण्यात येणार आहे. रब्बी हंगामात ज्वारीचे १३०० हेक्टर आणि करडईचे ६५० हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती श्री.नाईनवाड यांनी दिली.
सभेला बाघ व इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त श्री.शहारे, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, श्री.तुमडाम, श्री.तोडसाम यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.