जिल्हा परिषदेत राष्ट्रसंत तुकडोजींना अभिवादन

0
15

गोंदिया,दि.30 : जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत गोंदिया येथे आज (दि. ३०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्याच्या 108 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी  ए. के. मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी) एन.के. भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. स्व.)  राजेश राठोड यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी(सा.) श्रीमती वैशाली खोब्रागडे यांनी केले.