विधी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण संपन्न

0
22

गोंदिया, दि.३० : : जिल्ह्यातील गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात सन २०१९ या वर्षासाठी नियुक्त केलेल्या विधी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण २४ एप्रिल रोजी संपन्न झाले. सदर प्रशिक्षण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या वतीने घेण्यात आले. हे प्रशिक्षण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रशिक्षणाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.बी.दुधे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, सह दिवाणी न्यायाधीश ए.बी.तहसिलदार, वरिष्ठ अधिवक्ता आर.के.बोरकर, ॲड. ओम मेठी, जिल्हा सरकारी अभियोक्ता एम.एस.चांदवानी, ॲड.बिणा बाजपेई, एनएमडी विधी महाविद्यालयाचे प्रा.सुयोग इंगळे, प्रा.उमेश उदापुरे, ॲड.अर्चना नंदघळे, ॲड. ज्योती भरणे, ॲड. कौशल्या खटवानी, ॲड.दर्शना रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित सर्व विधी स्वयंसेवकांना त्‍यांच्या कर्तव्याप्रमाणे विधी सेवेची कामे योग्यरितीने पार पाडण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांनी उपस्थित विधी स्वयंसेवकांना नालसा अंतर्गत येणाऱ्या योजना, मनोधैर्य योजना, लोक अदालत, विधी स्वयंसेवकांची असलेली कर्तव्य याबाबत विस्तृत माहिती देवून वेगवेगळ्या कायदयाबाबतही माहिती दिली.
उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी शासकीय योजनांबद्दल माहिती देवून उपस्थित विधी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड.प्रणिता कुळकर्णी यांनी केले. आभार ॲड.शबाना अंसारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक आर.जी.बोरीकर, कनिष्ठ लिपीक एल.पी.पारधी, पी.एन.गजभिये, शैलेश पारधी व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.